अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार, अनेक प्रश्न अनुत्तरित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:18 AM2021-05-19T04:18:51+5:302021-05-19T04:18:51+5:30
तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय? दहावीच्या गुणांच्या आधारे तंत्रनिकेतन, आयटीआयमधील प्रवेश राबविण्यात येते. दहावीच्या मूल्यमापनावर तंत्रशिक्षण संचालनालयाची प्रवेश प्रक्रिया ठरणार ...
तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय?
दहावीच्या गुणांच्या आधारे तंत्रनिकेतन, आयटीआयमधील प्रवेश राबविण्यात येते. दहावीच्या मूल्यमापनावर तंत्रशिक्षण संचालनालयाची प्रवेश प्रक्रिया ठरणार असल्याचे समजते. आयटीआयसाठी प्रवेश परीक्षा घ्यायची की, इयत्ता नववीच्या गुणांवर आधारित प्रवेश द्यायचा. याबाबत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाची चर्चा सुरू आहेत.
अंतर्गत मूल्यमापन कसे?
दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे शाळांनी घेतलेल्या पूर्व, तोंडी व लेखी परीक्षांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार असे वाटत होते. मात्र, अद्याप अंतर्गत मूल्यमापन कसे होणार, कशा पद्धतीने करणार? याबाबत पालकांना चिंता वाटत आहे.
ग्रामीण भागाचे काय?
सीईटी परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेण्याचा निर्णय झाला तर ती परीक्षा शहरात घेणे शक्य आहे. परंतु ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्कच्या अडचणींमुळे परीक्षा देता येण्याची शक्यता कमी आहे.
परीक्षा ऑफलाइन झाली तर कोरोनाचे काय?
कोरोनाच्या प्रादुर्भावापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे. यासाठी राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे सीईटी ऑनलाइन घेतल्यास उत्तम. परंतु ऑफलाइन परीक्षा घेतल्यास, कोरोनाच्या प्रादुर्भावाचे काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
प्राचार्य, शिक्षक काय म्हणतात,
अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याबाबत अद्याप संभ्रम आहे. याबाबत शिक्षण मंडळाने तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मागविले आहे. सीईटी नाही झाली तर कशा पद्धतीने व कोणत्या आधारे अकरावीमध्ये प्रवेश देणार. याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. काहीही असले तरी शासनाने कोरोनाची स्थित पाहून, योग्य निर्णय घ्यावा.
- डॉ. रामेश्वर भिसे, प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय
दहावीच्या निकालाबाबत काही सूत्र ठरले नाही. अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याबाबतचा विचार सुरू आहे. शिक्षण स्तरावर तशी चर्चा सु आहे. परंतु अद्यापही याबाबत शासनाकडून काही सूचना नाहीत.
-दिलीप तायडे, प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक
कोरोना प्रादुर्भावामुळे ऑफलाइन सीईटी परीक्षा घेणे शक्य नाही. शासनाने विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घ्यावी किंवा शालेय अंतर्गत मूल्यमापन, गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवावी. याबाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा.
-आनंद साधू, प्राचार्य, कॅप्टन एन.टी. घैसास कनिष्ठ महाविद्यालय