‘स्थायी’चे सभापती पद; भाजपची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 01:27 PM2020-03-09T13:27:12+5:302020-03-09T13:27:19+5:30

सभापती पदासाठी निष्ठावान नगरसेवकाची निवड करण्यासाठी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Chairman of 'Standing'; BJP's reputation on stake | ‘स्थायी’चे सभापती पद; भाजपची प्रतिष्ठा पणाला

‘स्थायी’चे सभापती पद; भाजपची प्रतिष्ठा पणाला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापती पदावर विराजमान होण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांकडून ‘लॉबिंग’ केल्या जात असले तरी यावेळी प्रथमच सभापती पदासाठी निष्ठावान नगरसेवकाची निवड करण्यासाठी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पक्षाला २०२२ मधील महापालिका व २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचे असेल, तर पक्षाची बोळवण करणाऱ्यांना संधी कशी, असा सवाल यानिमित्ताने पक्षातून उपस्थित केला जात असल्याची माहिती आहे.
महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीसाठी नवीन ११ सदस्यांची निवड प्रक्रिया २८ फेब्रुवारी रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात पार पडली. भाजपच्यावतीने नगरसेवक सतीश ढगे, विजय इंगळे, अनिल मुरूमकार, आशिष पवित्रकार व संजय बडोणे यांची निवड करण्यात आली. याव्यतिरिक्त शिवसेना आघाडीचे दोन, काँग्रेस पक्षाकडून दोन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत लोकशाही आघाडीच्यावतीने दोन अशा एकूण अकरा सदस्यांची निवड करण्यात आली होती.
स्थायी समितीमध्ये भाजपचे संख्याबळ दहा असल्याने सभापती पदावर भाजप सदस्याची निवड होईल, यात दुमत नाही. २०१७ मध्ये पहिल्याच वर्षी भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबवित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे यांचे चिरंजीव नगरसेवक विशाल इंगळे यांना सभापती पदाची संधी बहाल केली. त्यावेळी २०१९ मधील विधानसभेची आकडेमोड ध्यानात ठेवून विशाल इंगळे यांची निवड केल्याची चर्चा होती. दुसºया वर्षी बाळ टाले यांना व तिसºया वर्षी शिवसेनेतून भाजपवासी झालेले विनोद मापारी यांना सभापती पदाची संधी देण्यात आली. अर्थात, बाळ टाले वगळता इतर पक्षातून आलेल्या नगरसेवकांना भाजपने प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
यावेळी सभापती पदाच्या निवडीसाठी पक्षाचा निकष नेमका कोणता, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, अनेकांचा पूर्वानुभव लक्षात घेता पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागल्याची खमंग चर्चा रंगली आहे.


भाजप माझी माय अन्...
२०१२ मध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपमधील अनेक विद्यमान नगरसेवकांनी ऐनवेळेवर पक्षाची एकनिष्ठा गुंडाळून ठेवत काँग्रेसप्रणीत अकोला विकास आघाडीच्या पारड्यात मतांचे दान केले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये महापौर पदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान संबंधित नाराज नगरसेवक पक्षात परतले. त्यावेळी पक्ष कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत भाजप माझी माय अन्...असे भावनिक उद्गार काढणाºया नगरसेवकांनी खिसे जड झाल्यावरच महापौरांच्या बाजूने मतदान केले होते, हे येथे उल्लेखनीय. अशा नगरसेवकांची सभापतीपदी निवड होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title: Chairman of 'Standing'; BJP's reputation on stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.