माँ लटीयाल भवानी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:18 AM2021-04-25T04:18:03+5:302021-04-25T04:18:03+5:30
----------------------------------------------- रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, अपघाताची शक्यता अकोट : अकोट-अकोला रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, वाहनचालक त्रस्त झाले आहे. ...
-----------------------------------------------
रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, अपघाताची शक्यता
अकोट : अकोट-अकोला रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, वाहनचालक त्रस्त झाले आहे. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यावर वल्लभनगरनजीक रस्त्याचे काम सुरू असून, मुरूम टाकण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे.
-----------------------------------------------
आठवडा बाजारात विद्युत व्यवस्था करा
बार्शीटाकळी : तालुक्यातील अनेक गावात आठवडा बाजार भरतो. गावात या रस्त्यावर रहदारी अधिकच असल्याने, विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागतो, तरी सुद्धा स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
------------------------------------------
स्वच्छतागृह बांधकाम केव्हा होणार?
वाडेगाव : येथील बसस्थानकानजीक स्वच्छतागृह नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. येथे बाजारपेठ असल्याने परिसरातील २० ते ३० खेड्यातील ग्रामस्थ खरेदीसाठी येतो. गावातच सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव असल्यामुळे नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
-----------------------------------------
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ
बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वाहनांची वर्दळ सतत असते. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
---------------------
‘संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करा !’
बाळापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भीतीचे सावट पसरले आहे. यापूर्वीही सर्वांनी कोरोनाचे दुष्परिणाम अनुभवले आहेत. आता पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली आहे. याकरिता गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. आगामी काळात येणाऱ्या धार्मिक सण व उत्सवांचे आयोजन करू नये, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
------------------------------------
अंगणवाडी केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव
तेल्हारा : ग्रामीण तसेच शहरी भागांतील काही अंगणवाडी केंद्राची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. सुविधा नसल्याने बालकांना अडचण जात आहे. अनेक अंगणवाडींमध्ये पाणीपुरवठा तसेच प्रसाधनगृहांचा अभाव असल्याचे दिसून आले.
----------------------------------
गॅस सिलिंडरची दरवाढ कमी करा
मूर्तिजापूर : सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ सुरूच ठेवल्याने दिवसेंदिवस महागाईचा आलेख गगनाला भिडत चालला आहे. त्यामुळे अनेकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. घरगुती गॅस सिलिंडर दरवाढ कमी करावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे.
---------------------------------------------------------------
जिल्ह्यातील वनसंपदा आली धोक्यात !
पातूर : तालुक्याला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. मात्र वनविभाग परिसरात कोट्यवधी रुपयांची वनसंपदेची तस्करी केली जात असल्याची नागरिकांमधून ओरड होत आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. याकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
---------------------------------------------------
‘शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा !’
पातूर : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरतीप्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार आहेत. ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वर्षांवरून ३५ वर्षे करण्यात यावी, अशी मागणी तयारी करीत असलेल्या बेरोजगार तरुणांनी केली आहे.