किसान विकास मंचद्वारे चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:33 AM2021-02-06T04:33:38+5:302021-02-06T04:33:38+5:30
-------------------------------------------- पारस येथे नाफेड अंतर्गत तूर खरेदी पारस: येथील स्व. वसंतरावजी दांदळे खासगी कृषी बाजार येथे नाफेड योजनेंतर्गत तूर ...
--------------------------------------------
पारस येथे नाफेड अंतर्गत तूर खरेदी
पारस: येथील स्व. वसंतरावजी दांदळे खासगी कृषी बाजार येथे नाफेड योजनेंतर्गत तूर खरेदी केंद्राच्या काटा पूजनाचा शुभारंभ जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुरेश गावंडे यांच्या हस्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते गजाननराव दांदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
-------------------------------------
पिंजर- बार्शीटाकळी रस्त्याचे काम अपूर्ण
निहिदा: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत पिंजर-बार्शीटाकळी रस्त्याचे बांधकाम कोट्यवधी रुपये खर्च करून दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले; मात्र रस्त्याचे काम काही ठिकाणी अपूर्ण असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (फोटो)
------------------------------
उगवा येथील सात सदस्य अज्ञातस्थळी रवाना
आगर: सरपंचपदासाठी दि.९ रोजी निवडणूक होणार असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. येथून उगवा येथे ओढाताण सुरू असून, सात नवनिर्वाचित सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाल्याची गावात चर्चा सुरू आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या १३ आहे.
------------------
कवठा परिसरात हरभरा सोंगणीला सुरुवात
कवठा: परिसरात हरभरा सोंगणीला सुरुवात झाली आहे. तसेच काही शेतकरी हरभऱ्याची काढणी करीत आहेत. यंदा हरभऱ्याचा एकरी चार ते पाच क्विंटल उतारा होत असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
-------
चतारी येथे कोरोना लसीकरण
खेट्री : महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या निकषांनुसार दि. ५ फेब्रुवारी रोजी पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयात पहिल्या टप्प्यात तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशासेविका यांना कोविड -१९ ची लस देण्यात आली.
-------------------------------------
पिंजर परिसरात अवैध धंद्यांना उत
निहिदा: पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जनुना, पातूर( नंदापूर) कानडी, घोटा, खोपडी, सालपी, सालपी आदी परिसरात शाळा, विद्यालय आणि मंदिर परिसरात खुलेआम जुगार, वरली मटक्याचे अड्डे सुरू असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत.
--------------------------------
नालीची दुरुस्ती करण्याची मागणी
खानापूर: येथील पातूर रस्त्यावरील नालीची दुरवस्था झाल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नालीच्या दुरुस्तीअभावी पातूर-अमरावती बससेवा बंद झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
--------------------------------
घरकुलाची कामे अर्धवटच!
कवठा: बाळापूर तालुक्यातील कवठा येथील अनेकांना मागील महिन्यांपासून अनुदान मिळत नसल्यामुळे रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाची कामे बंद पडली आहेत. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाने तातडीने अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
-----------------------------