चाकतिर्थ प्रकल्प पडला कोरडा

By admin | Published: March 21, 2017 02:12 PM2017-03-21T14:12:20+5:302017-03-21T14:12:20+5:30

मालेगाव: उन्हाळ्याला सध्याच सुरुवात झाली असताना मालेगाव तालुक्यातील चाकतिर्थ हा जलप्रकल्प कोरडा पडला आहे.

Chaktirth project falls dry | चाकतिर्थ प्रकल्प पडला कोरडा

चाकतिर्थ प्रकल्प पडला कोरडा

Next

पाणीटंचाईची समस्या: क्षमतेपेक्षा अधिक उपसा केल्याचा परिणाम

मालेगाव: उन्हाळ्याला सध्याच सुरुवात झाली असताना मालेगाव तालुक्यातील चाकतिर्थ हा जलप्रकल्प कोरडा पडला आहे. सिंचनासाठी वारेमाप उपसा केल्यामुळे या प्रकल्पातील जलसाठा संपल्याचे दिसत आहे.
मालेगाव तालुक्यात जऊळका रेल्वे यागावानजिक काटेपूर्णा नदीवर चाकतिर्थ प्रकल्प उभारण्यात आला आहे. जवळपास आठ ते दहा वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. प्रकल्पाची साठवण क्षमता मोठी असून, या प्रकल्प परिसरातील नाल्यांच्या संख्येमुळे हा प्रकल्प नेहमी काठोकाठ भरतो. यंदाही हा प्रकल्प पूर्णपणे भरला होता. त्यामुळे या उन्हाळ्यात परीसरातील गावांत पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा विश्वास वाटत होता; परंतु हा प्रकल्प अद्याप उन्हाळ्याला सुरुवातही झाली नसतानाच कोरडा पडला आहे. या प्रकल्पातून जऊळका रेल्वे येथील तीन गावे पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते. मालेगाव तालुक्यातील महत्त्वाच्या प्रकल्पात समाविष्ट असलेला हा प्रकल्प आटल्यामुळे या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासह त्यापूर्वी आवश्यकता वाटली तेव्हा खरीपातही या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला. त्यामुळे वेळेपूर्वीच हा प्रकल्प आटला आहे. सिंचनासाठी उपयुक्त असलेल्या या प्रकल्पातून शेकडो हेक्टर शेतीवर सिंचन होते; परंतु आता या प्रकल्पात पाणीच नसल्याने शेती सिंचनच काय, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभी झालेला आहे.
या प्रकल्पात पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात असले तरी, पाण्याचा वापर लक्षात घेता या प्रकल्पाच्या भिंतींची उंची वाढविणे आवश्यक झाले आहे.

Web Title: Chaktirth project falls dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.