गिरगित गेले शुभ्र खडू अन् लावला विज्ञानाचा लळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:23 AM2021-09-05T04:23:41+5:302021-09-05T04:23:41+5:30
यासोबतच शालेय स्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनामध्येही वैज्ञानिक प्रकल्पांसाठी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. दोनवेळा जवाहरलाल ...
यासोबतच शालेय स्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनामध्येही वैज्ञानिक प्रकल्पांसाठी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. दोनवेळा जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती. तसेच इंडियन सायन्स कॉंग्रेस प्रदर्शनासाठीही त्यांच्या विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प सादर करून कौतुकाची थाप मिळविली होती. अनेकवेळा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड व प्रथम क्रमांक पटकावला आहे. आतापर्यंत त्यांनी २६ विद्यार्थ्यांना संशोधक म्हणून घडविले आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्यांना जिल्हा शिक्षण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांचा बालभारती पाठ्यपुस्तकातील क्यूआर कोडसाठी (विज्ञान विभाग) ई-साहित्य निर्मितीतही सहभाग आहे.
फोटो:
ब्रिटिश कौन्सिलचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य
विजय पजई हे केवळ विज्ञान शिक्षकच नाहीतर विद्या प्राधिकरण अंतर्गत ब्रिटिश कौन्सिल (इंग्रजी) राज्यस्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सुद्धा कार्य करीत आहेत. राज्याच्या शैक्षणिक संशोधक व प्रशिक्षण परिषद पुणे येथील सेतू अभ्यासक्रम, पुनर्रचित अभ्यासक्रम निर्मितीही त्यांचा सहभाग आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अभ्यास गटाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.
असे केले आहेत संशोधन
विजय पजई यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जमिनीमध्ये जलपातळी वाढविण्यासाठी विशिष्ट पद्धतीने केलेली उपाययोजना या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. भूगर्भीय उष्णतेचा योग्यप्रकारे वापर करणे, पर्यावरणयुक्त समृद्ध भारत, आधुनिक सोलर कूकर या प्रकल्पांची राज्यस्तरावर, ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी उपाययोजना प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर, वैज्ञानिक पद्धतीने अन्नभेसळ ओळखणे व ती थांबविणे, विज्ञान व भुमिती विषय सोप्या पद्धतीने शिकविण्यासाठी विविध प्रकल्प तयार केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी डॉक्टर, अभियंता !
पजई सरांनी स्वत:तील शिक्षकाला घडवित, प्रयोगशील, उपक्रमशील शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली. गिरवित गेले शुभ्र खडू अन् लावला शिक्षणाचा लळा...या तन्मयतेने त्यांनी विद्यार्थ्यांना घडविले. त्यांच्या मार्गदर्शनात घडलेले प्रवीण नागरे हा अमेरिकेतील बोस्टन येथे अभियंता आहे. शुभम बांगडे हा कॅनडामध्ये सॉफ्टवेअर अभियंता, आकाश कौशल, अमित गवई हा पुण्यात संगणक अभियंता आहे. प्रतिज्ञा मेहरे, डॉ. विठ्ठल मस्के हे एमबीबीएस, एमडी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.