विपरीत परिस्थितीतून मार्ग काढण्याचे शेतक-यांपुढे आव्हान

By admin | Published: December 8, 2014 01:14 AM2014-12-08T01:14:06+5:302014-12-08T01:14:06+5:30

विदर्भातील शेतकरी व विदेशी कृषितज्ज्ञांचा सूर.

The challenge for farmers is to overcome the situation | विपरीत परिस्थितीतून मार्ग काढण्याचे शेतक-यांपुढे आव्हान

विपरीत परिस्थितीतून मार्ग काढण्याचे शेतक-यांपुढे आव्हान

Next

अकोला: विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा गंभीर प्रश्न आहे. त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान केवळ शेतकर्‍यांपुरते र्मयादित नाही, तर समाज व शासनापुढेही ते आहे. कृषी पद्धती, बी-बियाण्यांच्या किमती, एकूण उत्पादन खर्च व बाजारात कृषी उत्पादनास मिळणारे भाव, यात जगभरात तफावत असून, यावर साक ल्याने विचार होणे गरजेचे असल्याचा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला परिसंवादाच्या शेवटच्या खुल्या चर्चासत्रात उमटला.
भारताप्रमाणे प्रगत देशांतील शेतकरीदेखील संकटात आहेत. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे प्रग त राष्ट्रांसह आफ्रिका खंडातील देशांमध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिसून येत असल्याचे विदेशी कृषितज्ज्ञांनी स्पष्ट केले. प्रगत देशांमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी तेथील सरकार कुठलीही मदत करीत नाही. इंग्लंडमध्ये आत्महत्या करणे हा गुन्हा नसल्याचे इंग्लंड येथील महिला शेतकरी मोनिका हॉवर्ट यांनी स्पष्ट केले. आफ्रिका खंडातील देशांमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करण्यास स्वयंसेवी संस्था मदत करतात, असे केनियाच्या डोमिनका वान्झरू यांनी स्पष्ट केले.
विदेशात कृषिमालाचे भाव सरकार नियंत्रित करीत नाही, तर विक्रे ते व अडतेच निश्‍चित करत असल्याचे ऑस्ट्रेलियाचे फिल जेफरीज् यांनी सांगितले. भारताप्रमाणेच कृषिमालाचे जास्त उत् पादन झाल्यास भाव कमी मिळतो व कमी उत्पादन असल्यास तुलनेने जास्त भाव मिळतात.
काही विदेशी कंपन्यांनी पारंपरिक वाणांचे पेटेंट मिळविले असून, त्यामुळे बियाण्यांवर एकाधिकार मिळविला आहे. ऑस्ट्रेलियात तर बियाणे कंपनीकडूनच बियाणे घेणे शेतकर्‍यांसाठी बंधनकारक केले आहे. असे असतानादेखील पीकहानी झाल्यास त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नसल्याचे वास्तव फिल जेफेरीज् यांनी पुढे मांडले. भारताप्रमाणे इतर देशात कृषिमूल्य आयोग नाही. इतर कुठल्याही देशात बियाणे व खतांवर सवलत दिली जात नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
सेंद्रिय शेती भविष्याची गरज असली तरी केवळ तिच्यावर विसंबून जगाची अन्नाची गरज पूर्ण होऊ शक त नाही. त्यामुळे सेंद्रिय व रासायनिक शेतीमध्ये संतुलन साधण्याची गरज असल्याचे मत फ्रान्स येथील क्लाऊड बॉडींन यांनी व्यक्त केले. कृषी यांत्रिकीकरणाला र्मयादा असल्याचे जेफेरीज् यांनी अधोरेखित केले. कृषी मजुरांचा प्रश्नदेखील यावेळी उपस्थित केला होता.
चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. यावेळी आंतरराष्ट्रीय शेतकरी संवादचे सचिव जीम वेगन, ऑस्ट्रेलियातील फिल जेफरीज, उझबेकिस्तानच्या मुस्ताफिना फेरूझा, केनियाच्या डोमिनका वान्झरू व कॅनडाच्या शर्मिला गुंजल व्यासपीठावर उपस्थित हो त्या.
चर्चासत्रात कुटासा येथील शिवाजीराव देशमुख, यवतमाळचे माणिक कदम, दर्यापूरचे अरविंद नळकांडे, मोर्शी येथील माणिकलाल मंत्री, राजकुमार भटकळ, सुनंदा सालोडकर, ललित बहाळेंसह इतर शेतकर्‍यांनी सहभाग घेऊन कृषिप्रश्नावर परदेशी शेतकर्‍यांचे व कृषितज्ज्ञांची मते जाणून घेतली.

Web Title: The challenge for farmers is to overcome the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.