महिनाभरात ९0 कोटी रुपये खर्चाचे आव्हान
By admin | Published: February 29, 2016 02:34 AM2016-02-29T02:34:48+5:302016-02-29T02:34:48+5:30
अकोला जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत १५७ कोटींपैकी केवळ ६७ कोटी खर्च झाले.
संतोष येलकर /अकोला
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हय़ात विविध योजना आणि विकासकामांसाठी १५७ कोटी ९४ लाख ३ हजार रुपयांचा निधी मंजूर असला तरी, जानेवारी अखेरपर्यंत ६७ कोटी २ लाख ४३ हजार रुपयांची निधी खर्च करण्यात आला आहे. ह्यमार्च एन्डिंगह्णला केवळ महिनाभराचा कालावधी उरला असल्याने, जिल्हा वार्षिक योजनेचा उर्वरित ९0 कोटी ९१ लाख ६ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विविध विभागांमार्फत योजना राबविण्यासह विकासकामे केली जातात. त्यासाठी सन २0१५-१६ या वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १५७ कोटी ९४ लाख ३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी प्राप्त १४८ कोटी ९४ लाख ८१ हजार रुपयांच्या तरतुदीपैकी १२२ कोटी ६४ लाख ६२ हजारांचा निधी जिल्हा नियोजन विभागामार्फत संबंधित विभाग आणि यंत्रणांना वितरित करण्यात आला.
वितरित करण्यात आलेल्या निधीपैकी जानेवारी अखेरपर्यंत जिल्हा योजनेंतर्गत ६७ कोटी २ लाख ४३ हजारांचा निधी खर्च करण्यात आला. मंजूर निधीच्या तुलनेत उर्वरित ९0 कोटी ९१ लाख ६ हजारांचा निधी खर्च होणे अद्याप बाकी आहे. मार्चअखेरपर्यंत (मार्च एन्ड) निधी खर्च करावयाचा आहे. त्यासाठी आता केवळ महिनाभराचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ९0 कोटी ९१ लाख ६ हजारांचा निधी महिनाभरात खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.