हरभऱ्याचे भाव वधारताच साठेबाजी वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 03:05 PM2018-11-16T15:05:20+5:302018-11-16T15:05:51+5:30
अकोला : हरभºयाचे भाव सातत्याने वधारत असल्याचे लक्षात येताच साठेबाजी वाढली आहे. तूरपाठोपाठ हरभºयाचे भावही आता ४८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वधारत असल्याने ही साठेबाजी वाढली आहे.
अकोला : हरभºयाचे भाव सातत्याने वधारत असल्याचे लक्षात येताच साठेबाजी वाढली आहे. तूरपाठोपाठ हरभºयाचे भावही आता ४८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वधारत असल्याने ही साठेबाजी वाढली आहे. हरभरा आणि त्याच्याशी संबंधित डाळ, बेसनाला असलेली मागणी लक्षात घेता हरभºयाला ५५०० पर्यंत भाव मिळण्याची शक्यता आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात हरभरा, हरभºयाची डाळ आणि बेसनापासून तयार होणाºया तत्सम पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. वर्षभरात भारतभरात पाच लाख टन हरभºयाची आवश्यकता असते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात हरभºयाचे पीक घेतल्या जाते, तरीदेखील हरभºयाची मागणी पूर्ण होत नाही. ही स्थिती असतानादेखील सटोडिये आणि साठेबाजीमुळे हरभºयाला पाहिजे तसे भाव बाजारपेठेत मिळत नाही. महाराष्ट्रात हरभरा पिकविण्यात अकोल्याचे नावही अव्वल आहे. बागायती असलेले आणि खारपाणपट्टा असलेल्या प्रदेशात हरभरा होत असल्याने अकोल्याने हे नाव कमावले आहे. मागील तीन महिन्यांआधी जेव्हा शेतकºयांच्या घरात पीक होते, त्यावेळी ३५०० रुपये प्रतिक्विंटल हरभरा विकला गेला. शेतकºयांच्या घरातून माल निघताच आता हरभºयाचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात हरभºयाचे भाव ४८०० रुपयांवर गेले होते. चढ-उतारामुळे आता हरभºयाचे भाव ५५०० पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘एनसीडीईएक्स’कडे २४ हजार क्विंटल साठा
देशातील अडत दुकानदार, कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता केवळ ‘एनसीडीईएक्स’कडे २४ हजार क्विंटल साठा आहे. त्यातही अकोल्यातील साठा २३,४८४ क्विंटल एवढा आहे. यामध्ये बिकानेर २० क्विंटल आणि जयपूर २० क्विंटल एवढा आहे. साठवणूक आणि मागणीत मोठी तफावत असल्याने भाववाढ होण्याची दाट शक्यता आहे.