जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:19 AM2021-05-08T04:19:06+5:302021-05-08T04:19:06+5:30

मध्य भारतातील हवेचा कमी दाबाचा पट्टा, तापमानवाढीसोबत अधिक निरंतर सक्रिय आहे. जमिनीपासून दीड ते तीन किमी अंतरावर आर्द्रतेचे ...

Chance of rain with strong winds in the district | जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Next

मध्य भारतातील हवेचा कमी दाबाचा पट्टा, तापमानवाढीसोबत अधिक निरंतर सक्रिय आहे. जमिनीपासून दीड ते तीन किमी अंतरावर आर्द्रतेचे प्रमाण ६० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढलेले आहे. शुक्रवारच्या उपग्रह छायाचित्रानुसार कर्नाटक, तेलंगणा, गोवा सीमा परिसरातील तालुक्यात वातावरण ढगाळलेले आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर ते बुलडाणा पार सातपुडापर्वत रांगेपर्यंत पावसाची प्रणाली सक्रिय होताना दिसत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळलेले आहे. त्यामुळे ७ ते १० मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

--कोट--

मॉन्सूनपूर्व, वळवाचा पावसाचा कालावधी साधारणपणे १५-३० मेपर्यंत असतो. वातावरणात होणाऱ्या सलग बदलामुळे गेल्या महिन्यापासून वातावरण सतत ढगाळलेले आहे. ही परिस्थिती पुढेही कायम राहण्याची शक्यता दिसून येत आहे. सततच्या पावसाने तापमानात घट होवू शकते.

- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक

Web Title: Chance of rain with strong winds in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.