पावसाची शक्यता; जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:23 AM2021-08-21T04:23:32+5:302021-08-21T04:23:32+5:30
नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरू असताना व पूर परिस्थिती असताना पूर पाहण्यास गर्दी ...
नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरू असताना व पूर परिस्थिती असताना पूर पाहण्यास गर्दी करू नये. पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे, असे आवाहन करीत संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिले आहे.
महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाण्याची आवक लक्षात घेता, येत्या पाच ते सहा तासांत प्रकल्पातील जलसाठा ९५ टक्क्यांपेक्षा अधिक होण्याचा अंदाज असून, त्यानंतर येणारे पुराचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तसेच अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंटिमीटर उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.