राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता!
By admin | Published: August 18, 2015 01:32 AM2015-08-18T01:32:40+5:302015-08-18T01:32:40+5:30
विदर्भात मोहाडी फाटा येथे ७ से.मी. पावसाची नोंद.
अकोला : येत्या चार दिवसात राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गत चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी तुरळक स्वरू पाचा पाऊस झाला असून, पावसाची सर्वाधिक नोंद विदर्भातील मोहाडी फाटा येथे ७ से.मी. एवढी झाली आहे. गत चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून, विदर्भातील मोहाडी फाटा येथे ७ से.मी., भामरागड येथे ६ से.मी., दर्यापूर येथे ३ से.मी., एटापल्ली व गोंदिया येथे प्रत्येकी २ से.मी. नोंद झाली असून, चिखलदरा, हिंगणघाट, लाखणी, साकोली, समुद्रपूर या ठिकाणी प्रत्येकी १ से.मी. पाऊस झाला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण-गोवाच्या बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पाऊस झाला. येत्या १८ व २१ ऑगस्टपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, १८ ते २३ ऑगस्टपर्यंत पुणे व परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरू पाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई व परिसरात १८ व १९ ऑगस्ट रोजी पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे.