पंढरपूरात वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी अकोल्याचे बचाव पथक चंद्रभागा नदीपात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 04:51 PM2018-07-22T16:51:40+5:302018-07-22T17:06:11+5:30
अकोला: आषाढी एकादशिनिमित्त पंढरपूर येथे जाणाºया वारकºयांच्या संरक्षणासाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व बचाव पथकाचे सदस्य दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चंद्रभागा नदीपात्रात सज्ज आहेत.
अकोला: आषाढी एकादशिनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व बचाव पथकाचे सदस्य दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चंद्रभागा नदीपात्रात सज्ज आहेत. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात पथकाचे २७ जिवरक्षक जवान सज्ज आहेत. आषाढीवारी कालावधीत चंद्रभागा नंदीपात्रात दगडीपुल ते विष्णुपद घाट व वाळवंट परीसरात उद्भवणाऱ्या कुठल्याही स्वरुपाच्या आपत्तीचा सामाना करण्यासाठी पथकाचे सदस्य शोध व बचाव साहीत्यासह तयार आहेत. चंद्रभागा नदीपात्रात ‘रेस्क्यू बोट’ च्या सहाय्याने संपूर्ण नदीपात्रातील घाट आणी पुंडलीक महाराज मंदीर परीसरावर पथकाचे सदस्य नजर ठेऊन आहेत. विशेष म्हणजे, पुंडलीक महाराज मंदिर परीसरात पाण्यात बुडून वारकºयाचा मृत्यू झाल्याची एकही घटना घडली नसल्याचे सदाफळे यांनी सांगितले.
तीन वारकऱ्यांना वाचविले
बचाव पथकाने गत तीन दिवसांत नदीपात्रात बुडत असलेल्या तीन वारकºयांचे प्राण वाचविले आहे. रविवारी चंद्रभागा नदी पात्रातुन दत्तघाटावरुन पुंडलिक महाराज मंदीराकडे पोहत येत असलेल्या सात भावीकांपैकी एकजण पात्राच्या मध्यभागी येऊन थकला. तेवढयात क्षणाचाही विलंब नकरता चौफाळयावर तैनात असलेल्या गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या जवानांनी रेस्क्यू बोट त्या युवकाजवळ नेली आणी दोन जिवरक्षकांनी त्याला बोटमधे घेतले. यामुळे या भाविकाचे प्राण वाचले.
याच पद्धतीने दुसऱ्या वारकरी भक्ताला म्हसोबा घाटाजवळुन वाचविले आहे. तीन दीवसापासुन एकुन तीन वारकरी भक्तांना वाचविण्यात यश आल्याचे पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी सांगितले.
मंदिर समितीतर्फे पथकाचा होणार सत्कार
संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने गत चार वर्षांपासून केलेली कामगिरी पाहुन विठ्ठल रुक्मिणी मंदीर समीती, पंढरपूर यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे आणी सदस्यांचा येत्या २४ तारखेला सत्कार करण्याचे ठरविले आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष मा.डॉ.अतुल भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ही माहिती दिल्याचे दीपक सदाफळे यांनी सांगितले.