हवामान बदलानुसार पीकपद्धतीत बदला करावा लागेल!

By admin | Published: March 10, 2016 01:54 AM2016-03-10T01:54:01+5:302016-03-10T01:54:01+5:30

जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचा शेतक-यांना सल्ला

The change in climate change will have to be changed! | हवामान बदलानुसार पीकपद्धतीत बदला करावा लागेल!

हवामान बदलानुसार पीकपद्धतीत बदला करावा लागेल!

Next

विवेक चांदूरकर / वाशिम
व-हाडात ७00 ते ९00 मिमी पाऊस पडतो; मात्र त्यानंतरही येथे कृषिव्यवसायाची अधोगती झाली असून, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गचक्र बदलले आहे. ऋतुमानही बदलले आहे. या बदलांचा अभ्यास करून शेतकर्‍यांना पीकपद्धतीत बदल करावा लागेल, अन्यथा आत्महत्यांचा हा क्रम असाच सुरू राहील, असा सल्ला मॅगसेसे पुरस्कारविजेते जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी शेतकर्‍यांना दिला. जलयुक्त शिवार अभियानाच्या कार्यक्रमासाठी ते वाशिम येथे आले होते.

प्रश्न : वर्‍हाडात तीन वर्षांंपासून सरासरीएवढा पाऊस पडत असल्यावरही दुष्काळ कायम आहे ?
उत्तर: वातावरणात बदल झाला आहे. वृक्षतोड व ग्लोबल वॉर्मिंंगमुळे तापमान वाढले आहे. परिणामी विदर्भात पेरणीच्या वेळी पाऊस येत नाही, तर ज्यावेळी पीक काढणीला येते तेव्हा पाऊस होतो. त्यानुसार शेतकर्‍यांना पीकपद्धतीतही बदल करावा लागणार आहे. बदलत्या पावसाचा अभ्यास करावा लागणार आहे. पारंपरिक पीकपद्धती सोडून नवी पिके घ्यावी लागतील, तरच शेतकरी तग धरू शकेल; अन्यथा दरवर्षीच दुष्काळ कायम राहील.

प्रश्न : शेतकर्‍यांना पीकपद्धतीत कशाप्रकारे बदल करावे लागतील?
उत्तर: काही पिके तीन महिन्यांची असतात, तर काही सहा महिन्यांची असतात. कमी कालावधीच्या पिकांची मुळं ही जमिनीत एक ते दीड फूट खोलात जातात. त्यांना कमी प्रमाणात पाणी लागते. जी पिके सहा महिन्यांची असतात, त्यांची मुळं जमिनीत अधिक खोलवर जातात. त्यांना जास्त पाणी लागते. पावसाच्या प्रमाणानुसार पिके घ्यायला हवीत.

प्रश्न : काही जलतज्ज्ञांनी जलयुक्त शिवार चुकीचे असल्याचा दावा केला आहे ?
उत्तर: जलयुक्त शिवार हे अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आले आहे. मी स्वत: याचा आराखडा तयार केला आहे. याची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाली, तर निश्‍चितच पाणीटंचाई दूर होईल. जलयुक्त शिवार चुकीचे असल्याचे म्हणणारे यंत्राच्या साहाय्याने कामे करतात. त्याचा पुरस्कार ते करतात; मात्र लोकांच्या मदतीने जलसंवर्धनाचे काम केले, तर चांगले निकाल निश्‍चितच दिसतात.

प्रश्न : जलयुक्त शिवार अभियानातील कामे चांगल्या दर्जाची होत आहेत काय?
उत्तर: जलयुक्त शिवारमध्ये होत असलेली कामे ही ठेकेदारांच्या माध्यमातून होत आहेत. ही कामे जर नागरिकांच्या सहभागाने अधिकार्‍यांमार्फत करण्यात आली, तर निश्‍चितच पाणीटंचाई दूर होईल. ठेकेदार स्वत:चा फायदा पाहतात. अधिकारी मात्र गावाचा व देशाचा फायदा पाहून कामे करतात.

प्रश्न : जलयुक्तच्या कामांमध्ये लोकांचा सहभाग आवश्यक आहे काय?
उत्तर: जलसंवर्धनाच्या कामांमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक आहे. गावात जलसंवर्धनाची कामे करीत असताना स्थानिकांकडून कोणती कामे कोणत्या ठिकाणी करावी, याची माहिती घेणे आवश्यक आहे. त्यांना अधिकार्‍यांपेक्षा त्यांच्या गावाचा चांगला अभ्यास असतो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानुसार व त्यांच्या सहभागाने कामे करायला हवीेत. त्यांचा सहभाग लाभला, तर पाण्याचा वापरही योग्य पद्धतीने होईल.

प्रश्न : शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेबद्दल तुमचे काय मत आहे ?
उत्तर: शासनाच्यावतीने स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येत आहे. स्मार्ट सिटी म्हणजे काय? चांगले रस्ते, काचेच्या इमारती यालाच स्मार्ट सिटी म्हणता येईल काय? त्यापेक्षा शासनाने स्मार्ट गाव, स्मार्ट नदी योजना राबवायला हवी.

Web Title: The change in climate change will have to be changed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.