एनटीएस परीक्षेच्या तारखेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:33 PM2017-10-17T13:33:50+5:302017-10-17T13:34:03+5:30
अकोला: विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, त्यांना आर्थिक सहाय्य करावे, या सहाय्यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ही परीक्षा राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते. राज्य स्तरावर एनटीएसची परीक्षा ५ नोव्हेंबरऐवजी १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

एनटीएस परीक्षेसाठी जिल्ह्यामध्ये चार परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. अकोट, तेल्हारा तालुक्यातील शाळांसाठी भाऊसाहेब पोटे विद्यालय अकोट हे केंद्र आहे. जिल्ह्यातील बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व अकोला तालुक्यातील शाळांसाठी न्यू इंग्लिश हायस्कूल आणि ज्युबिली इंग्लिश हायस्कूल, रामदासपेठ, होलीक्रॉस कॉन्व्हेंट आणि जागृती विद्यालय हे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. परीक्षा प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची १२ नोव्हेंबर रोजी परीक्षा होईल, असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, दिनेश तरोळे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अरूण शेगोकार, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र भास्कर यांनी कळविले.