मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 04:21 PM2019-07-01T16:21:00+5:302019-07-01T16:24:59+5:30

अकोला : मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात अनेक बदल झाले असून, ते बदल १ जुलै २०१९ पासून होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.

Changes in schedule of Central and South Central Railways | मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

Next

अकोला : मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात अनेक बदल झाले असून, ते बदल १ जुलै २०१९ पासून होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे. काही गाड्यांमध्ये बदल करण्यात आल्याने पुढच्या सर्व स्थानकांवर त्याचा प्रभाव पडणार आहे.
१२१३९ क्रमांकाची मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १५.०० ऐवजी आता १४.५५ वाजता सीएसटी येथून रवाना होणार आहे. १२८७० क्रमांकाची हावडा-मुंबई एक्स्प्रेस २३.१५ वाजताऐवजी २३.२५ वाजता सीएसटीवरून सुटेल. १२११२ क्रमांकाची अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ०६.२५ ऐवजी ०६.४५ वाजता सीएसटीला पोहोचेल. ११४१७/११४१८ क्रमांकाची पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेस ७ मार्च १९ पासून सुरू आहे. १९००३/१९००४ क्रमांकाच्या बांद्रा टर्मिनस-भुसावळ एक्स्प्रेस १८ फे ब्रुवारीपासून सुरू आहे. मध्य रेल्वेतून जाणाºया गाड्यांमध्ये १२७५१/१२७५२ हजूर साहिब नांदेड-जम्मू तवी हमसफरचा समावेश आहे. ही एक्स्प्रेस गाडी अकोलाहून १२ आॅक्टोबर २०१८ पासून सुरू आहे. १२४४०/१२४३९ श्री गंगानगर हजूर साहीब नांदेड एक्स्प्रेस खंडवा या गाडीचादेखील समावेश आहे. ही गाडी ३१ मे १९ पासून अकोल्यातून धावत आहे.

Web Title: Changes in schedule of Central and South Central Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.