चान्नी पाेलिसांची दारु अड्डयांवर छापेमारी; निर्गुदा नदीपात्रातील गावठी दारु अड्डे उध्वस्त
By सचिन राऊत | Published: March 25, 2024 06:48 PM2024-03-25T18:48:34+5:302024-03-25T18:48:44+5:30
आलेगाव येथील रहीवासी शेख माेसीन शेख मुसा याच्या दारु अड्डयावर छापा टाकून ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
अकाेला : चान्नी पाेलिस स्टेशन हद्दीतील सस्ती व आलेगाव येथील निर्गुना नदीपात्रात सुरु असलेल्या गावठी दारु अड्डयांवर चान्नी पाेलिसांनी छापेमारी केली. चार दारु अड्डयावरून चार जणांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून गावठी दारु बनविण्यासाठी असलेल्या कच्चा मालासह दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.
चान्नी पाेलिस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांना मीळालेल्या माहीतीवरुन त्यांनी निर्गुना नदीपात्रात छापा टाकून सस्ती येथील रहीवासी कैलास दामाेदर वानखडे, प्रशांत माेतीराम अंभाेरे यांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून ४० लीटर दारुसाठा २२० लीटर सडवा माेवा असा एकून ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर प्रविण माेतीराम अंभाेरे यास ताब्यात घेउन त्याच्याकडून १७ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.
त्यानंतर आलेगाव येथील रहीवासी शेख माेसीन शेख मुसा याच्या दारु अड्डयावर छापा टाकून ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच माेतीखान कालेखान यास ताब्यात घेउन त्याच्याकडून सात हजार रुपयांचा दारुसाठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चार दारु विक्रेत्यांकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुध्द चान्नी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाइ पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे, उपविभागीय पाेलिस अधिकारी गाेकुळ राज यांच्या मार्गदर्शनाखाली चान्नीचे ठाणेदार विजय चव्हाण व कर्मचाऱ्यांनी केली.