चान्नी पोलिसांनी पकडलेला विनापरवाना वाळूचा ट्रॅक्टर सोडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:31 AM2021-05-05T04:31:07+5:302021-05-05T04:31:07+5:30

पिंपळखुटा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच, चान्नी पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. ...

Channi releases unlicensed sand tractor seized by police! | चान्नी पोलिसांनी पकडलेला विनापरवाना वाळूचा ट्रॅक्टर सोडला!

चान्नी पोलिसांनी पकडलेला विनापरवाना वाळूचा ट्रॅक्टर सोडला!

Next

पिंपळखुटा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच, चान्नी पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. पिंपळखुटा येथून राहेरकडे विनापरवाना रेतीने भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली आढळून आला. पोलिसांनी रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत चालकांना विचारले असता, चालकाने परवाना नसल्याचे सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांनी अवघ्या ८ मिनिटांमध्ये ट्रॅक्टर मालकाशी भ्रमणध्वनीवर संभाषण साधून रेतीने भरलेला ट्रॅक्टर परस्पर सोडून दिल्याची माहिती आहे. याबाबत ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाला याबाबत विचारणा केली असता, ट्रॅक्टरमधील रेती चालकाने खाली केल्याचे त्यांनी सांगितले. ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरमधून रेती खाली केली असली तरी, पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु पोलिसांनी तसे न करता परस्पर ट्रॅक्टर सोडून दिला. त्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ठाणेदार रजेवर असल्याचा गैरफायदा

ठाणेदार राहुल वाघ आजारी असल्याने ते गेल्या काही दिवसांपासून रजेवर असल्याने त्याच्या जागी प्रभारी ठाणेदार यांच्याकडे कार्यभार असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन विनापरवाना रेतीचा ट्रॅक्टर परस्पर सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

राहेर-पिंपळखुटा दरम्यान पोलिसांनी विनापरवाना रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडले. परंतु काही वेळातच ट्रॅक्टर साेडून देण्यात आल्याबाबत काही जणांचे फोन आले होते. त्याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

- दीपक बाजड, तहसीलदार पातूर

Web Title: Channi releases unlicensed sand tractor seized by police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.