आलेगाव वनपरिक्षेत्रातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:29+5:302021-07-14T04:22:29+5:30
आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नवेगाव क्षेत्रातील एका आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या सागवान झाडांची संख्या प्रत्यक्षात असलेल्या झाडांच्या संख्येपेक्षा जास्त ...
आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नवेगाव क्षेत्रातील एका आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या सागवान झाडांची संख्या प्रत्यक्षात असलेल्या झाडांच्या संख्येपेक्षा जास्त दाखविण्यात आली व ही जास्त दाखविण्यात आलेली झाडे राखीव वनक्षेत्रातून आणि दुसऱ्या एका आदिवासी शेतकऱ्याच्या शेतातून तोडण्यात आली, असे के.डी. श्रीवास यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सुद्धा पाहणी करून पासिंगचे हॅमर लावले. त्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याची फसवणूक झाली तसेच शासनाची सुद्धा या प्रकरणात फसवणूक झाली आहे. याशिवाय आदिवासी शेतकऱ्याच्या शेतातील सागवान झाडांचे निष्कासन हे वनविभागामार्फत व्हायला हवे; परंतु त्यासाठी एका ठेकेदाराने प्रकरण दाखल केल्याचे के.डी. श्रीवास यांनी तक्रारीत म्हटले आहे. या सर्व प्रकरणात संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. दहा दिवसांत कारवाई व्हावी. अन्यथा उपोषणाचा इशारा के.डी. श्रीवास यांनी दिला आहे.