मनपाच्या एलबीटी विभागात चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:16 AM2021-05-29T04:16:07+5:302021-05-29T04:16:07+5:30

पंढरपूरच्या वारीसाठी परवानगी द्या! अकोला: महाराष्ट्रातील असंख्य भक्तांचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्माई यांच्या दर्शनासाठी परवानगी देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ आमदार ...

Chari in the LBT department of the corporation | मनपाच्या एलबीटी विभागात चाेरी

मनपाच्या एलबीटी विभागात चाेरी

Next

पंढरपूरच्या वारीसाठी परवानगी द्या!

अकोला: महाराष्ट्रातील असंख्य भक्तांचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्माई यांच्या दर्शनासाठी परवानगी देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ आमदार गाेवर्धन शर्मा यांनी केली आहे. २० जुलै राेजी आषाढी एकादशी असून, त्या निमित्ताने वारकऱ्यांना काेराेना नियमांचे पालन करून वारीसाठी परवानगी देण्याची मागणी आ.शर्मा यांनी शासनाकडे केली आहे.

शहरात ७५ जणांना काेरोनाची लागण

अकाेला: मागील काही दिवसांपासून महापालिका क्षेत्रात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या कमी हाेत चालली आहे. शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार, शहरातील ७५ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. यामध्ये पूर्व झाेनमध्ये २७, पश्चिम झाेन १३, उत्तर झाेन ७ व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचे २८ रुग्ण आढळून आले आहेत.

१,३०२ जणांनी केली काेराेना चाचणी

अकाेला: शहराच्या विविध भागांत काेराेनाचा प्रादुर्भाव झाला आहे. मागील काही दिवसांपासून काेराेनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या सुमारे १,३०२ जणांनी शुक्रवारी चाचणी केली. यामध्ये १८५ जणांनी आरटीपीसीआर व १,११७ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.

उघड्यावर जलवाहिनी; मनपाचे दुर्लक्ष

अकाेला: जुने शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदान ते श्रीवास्तव चाैकपर्यंत मुख्य जलवाहिनीसाठी रस्त्यालगत खाेदकाम करण्यात आले. मागील दहा ते बारा दिवसांपासून सुरू असलेल्या या कामात जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले असून, काही पाइप उघड्यावर बेवारस असल्याचे चित्र आहे. याकडे महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.

पाेळा चाैकात अवैध नळजोडणी

अकोला : शहराच्या विविध भागांत अवैधरीत्या नळजोडणी घेण्यात आली आहे. जुने शहरातील पाेळा चाैकात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरीत्या नळजाेडणी घेऊन, त्या माध्यमातून दिवसभर पाण्याचा बेसुमार वापर केला जात आहे. हा प्रकार मनपा जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास येत असतानाही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.

रस्त्यावर सडका भाजीपाला

अकोला : शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या जठारपेठ चाैकात भाजीपाला विक्रेता सडका भाजीपाला रस्त्यालगत फेकत असल्याचे चित्र आहे.

याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष हाेत असून, साफसफाईअभावी परिसरात प्रचंड घाण व कचरा साचल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Chari in the LBT department of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.