अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:18 AM2021-02-14T04:18:01+5:302021-02-14T04:18:01+5:30
अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जठारपेठ येथील रहिवासी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला वारंवार फोन ...
अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जठारपेठ येथील रहिवासी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला वारंवार फोन करणे तसेच लग्न करण्यासाठी धमकावणाऱ्या युवकाविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
जठारपेठ येथील रहिवासी एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कामाने कुठेहो गेली असता तिचा जठारपेठ येथील रहिवासी संकेत उर्फ यश युवराज मेश्राम हा युवक पाठलाग करत होता. तसेच वारंवार फोन करून लग्नासाठी आमिष देत होता; मात्र अल्पवयीन मुलीला त्रास असह्य झाल्यानंतर तिने या प्रकरणाची माहिती आई-वडिलांना दिली. यावरून त्यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संकेत मेश्राम याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत.