दस्तावेजामध्ये खोडतोड करून फसवणूक

By admin | Published: June 27, 2016 02:35 AM2016-06-27T02:35:48+5:302016-06-27T02:35:48+5:30

डॉक्टरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

Cheating by scraping documents | दस्तावेजामध्ये खोडतोड करून फसवणूक

दस्तावेजामध्ये खोडतोड करून फसवणूक

Next

अकोला: विद्या नगर परिसरातील बालाजी नगर येथील रहिवासी इसमाच्या प्लॉटच्या दस्तावेजामध्ये खोडतोड करून तसेच हेरफेर करून त्यामध्ये नोंद करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी शनिवारी न्यायालयाच्या आदेशावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बालाजी नगरातील रहिवासी हरिदास चोखोबा कांबळे यांच्या प्लॉटच्या दस्तावेजामध्ये लातूर येथील रहिवासी डॉ. अंबादास चोखोबा कांबळे, रामदासपेठ परिसरातील रहिवासी वंदना महेंद्र डोंगरे व गिरी नगरातील रहिवासी संतोष यशवंत इंगळे या तिघांनी हेराफेरी करीत तसेच खोडतोड करून आणखी एका नावाची नोंद केली. हा प्रकार हरिदास कांबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. अंबादास चोखोबा कांबळे, वंदना महेंद्र डोंगरे व संतोष यशवंत इंगळे या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ४६८, ४७१ 0 ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Cheating by scraping documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.