जप्त खतांचे नमुने पाठविले तपासणीसाठी
By Admin | Published: August 1, 2015 02:04 AM2015-08-01T02:04:54+5:302015-08-01T02:04:54+5:30
अवैध साठय़ांचा शोध सुरू.
अकोला : आकोट रोडवरील गोदामातून दीपक फर्टिलायझर अँन्ड पेट्रो केमिकल्स कार्पोरेशन लि. (महाधन) च्या ४ कोटी २७ लाख रुपयांचा खतांचा साठा कृषी अधिकार्यांनी बुधवारी जप्त केला. अवैधरीत्या साठविण्यात आलेले हे खत बनावट आहे काय? याची तपासणी करण्यासाठी खतांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकाद्वारे जिल्हय़ात अवैध खते, बियाणे, कीटकनाशके या संदर्भात चौकशी सुरू आहे. गुरुवारी या पथकाने महाधनचे एनपीके, १९:१९:१९, 00:५२:३४, १२:६१:00, १३:४0:१३, बेसल्फ गंधक असे एकूण ३४४.८२ मेट्रिक टन आणि १0:२६:२६ , २४:२४:00 अमोनियम सल्फेट २१७ मेट्रिक टन खतांचा साठा जप्त केला. अवैधरीत्या साठविण्यात आलेले हे खत बनावट आहे काय? याची तपासणी करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने नमुने पाठविण्यात आल्याची माहिती अकोला जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी गिरीष नानोटी यांनी दिली. जिल्हय़ात सर्रास अवैध खते निर्मिती व अवैध साठा करणे सुरू च असून, कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात आणखी कुणाकडे अवैध खतसाठा आहे काय? याचा शोध घेण्यात येत आहे.