शेतकऱ्यांच्या याद्यांसह धनादेश आज बँकांमध्ये होणार जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 02:34 PM2020-02-10T14:34:26+5:302020-02-10T14:34:30+5:30

सोमवारी शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश तहसील कार्यालयांमार्फत संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात येणार आहेत.

Checks with farmers' lists will be deposited in banks today! | शेतकऱ्यांच्या याद्यांसह धनादेश आज बँकांमध्ये होणार जमा!

शेतकऱ्यांच्या याद्यांसह धनादेश आज बँकांमध्ये होणार जमा!

Next

अकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी तिसºया टप्प्यात प्राप्त झालेली ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपये मदतीची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली असून, मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सोमवारी शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश तहसील कार्यालयांमार्फत संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात येणार आहेत.
अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्याच्या दोन टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेली २३१ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून, मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांची मदत शासनामार्फत १ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम ४ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली असून, मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमार्फत सोमवार, १० फेबु्रवारीपासून सुरू होणार आहे.

तालुकानिहाय वितरित अशी आहे मदतीची रक्कम!
पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी तिसºया टप्प्यात ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांची मदत सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. त्यामध्ये अकोला-६ कोटी ७६ लाख ५५ हजार रुपये, बार्शीटाकळी-५ कोटी ६७ लाख ९० हजार रुपये, अकोट-७ कोटी ५१ लाख ७८ हजार रुपये, तेल्हारा-६ कोटी ६२ लाख ८२ हजार रुपये, बाळापूर-६ कोटी ४७ लाख ५० हजार रुपये, पातूर-३ कोटी ३८ लाख ९१ हजार रुपये आणि मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी ३४ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.

 

Web Title: Checks with farmers' lists will be deposited in banks today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.