स्वस्त धान्य दुकानदार,कर्मचारी व हमाल यांची काेरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:18 AM2021-04-02T04:18:16+5:302021-04-02T04:18:16+5:30

मूर्तिजापूर येथील शासकीय गोदाम येथे कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराला तालुक्यातील १६३ स्वस्त धान्य दुकानदार कर्मचारी व ...

Cherona testing of cheap grain shopkeepers, employees and porters | स्वस्त धान्य दुकानदार,कर्मचारी व हमाल यांची काेरोना चाचणी

स्वस्त धान्य दुकानदार,कर्मचारी व हमाल यांची काेरोना चाचणी

Next

मूर्तिजापूर येथील शासकीय गोदाम येथे कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराला तालुक्यातील १६३ स्वस्त धान्य दुकानदार कर्मचारी व हमाल यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यात सर्व रास्त भाव दुकानदारांची आरटीपीसीआर तपासणी व रॅपिट अँटिजेन टेस्ट करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसीलदार प्रदीप पवार, नायब तहसीलदार चैताली यादव, पुरवठा निरीक्षक प्रवेश देवकते, गोदाम व्यवस्थापक सुनील राऊत यांच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासन निर्देशानुसार मूर्तिजापूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार कर्मचारी व शासकीय गोदामातील हमाल यांची कोरोना तपासणी करण्याबाबत प्रशासनाने तसे निर्देश दिले आहेत.

Web Title: Cherona testing of cheap grain shopkeepers, employees and porters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.