अग्रमानांकित बुध्दिबळपटूंची विजयी घोडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 06:59 PM2019-11-03T18:59:10+5:302019-11-03T18:59:28+5:30
भारतातील महाराष्ट्र तेलंगाणा, बिहार आदी राज्यातील १५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.
अकोला : अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकन बुध्दिबळ स्पर्धेच्या पहिल्या पर्वात अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर चक्रवर्ती रेड्डी(तेलंगणा), एम साई अग्नी जीवितेश (तेलंगणा) सौरभ चौबे (मध्यप्रदेश) मयूर पाटील (महाराष्ट्र) यांनी २ पैकी २ डाव जिंकत स्पर्धेत पहिल्या स्थानावर आघाडीवर आहेत.
भारतातील महाराष्ट्र तेलंगाणा, बिहार आदी राज्यातील १५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. विजयी खेळाडूंना रुपये ४ लाख रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना फिडे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ व अकोला जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने व पी. आर. चेस अकॅडमी आयोजित या स्पर्धेला भारतातील तमाम क्रीडा मंडळ,शाळा, महाविद्यालय, क्लब यातील नवोदित खेळाडूंनी भेट देत आहेत. स्पधेर्ला प्रमुख पंच म्हणून मुंबई चे आंतरराष्ट्रीय पंच प्रेम पंडित काम पाहत आहे.