छत्रपती संभाजीराजे आज अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:26+5:302021-07-04T04:14:26+5:30
सॅनिटायझर मशीन सुरू करण्याची मागणी अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कुलसचिव यांचे दालन असलेल्या इमारतीत सॅनिटायझर ...
सॅनिटायझर मशीन सुरू करण्याची मागणी
अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कुलसचिव यांचे दालन असलेल्या इमारतीत सॅनिटायझर मशीन बसविण्यात आले आहे; परंतु हे मशीन बंद असून मशीन सुरू करण्याची मागणी होत आहे.
रस्त्याची चाळण
अकोला : ग्रामीण भागात रस्त्याची चाळण झाली असल्याने, वाहनधारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याचा धोका आहे. पावसामुळे या समस्येमध्ये आणखी भर पडली असल्याने नागरिकांत रोष आहे.
मजुरी वाढविण्याची कामगारांची मागणी
अकोला : मागील काही वर्षांमध्ये सतत महागाई वाढत आहे. त्या तुलनेत कामगारांच्या मजुरीत वाढ झाली नसल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांची संख्या आहे. काही कामगार औद्योगिक क्षेत्रात असले तरी घरकामासाठी तसेच इतरही ठिकाणी कामगार आहेत; मात्र त्यांची मजुरी मागील काही वर्षांमध्ये वाढलीच नसल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे.
विजेचा सुरळीत पुरवठा करावा!
अकोला : ग्रामीण भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळा असला तरी उकाडा कायम आहे. त्यामुळे विजेचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वातावरणातील बदलामुळे भीती
अकोला : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला!
अकोला : जिल्ह्यात सिंचन उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत; परंतु अपेक्षित पाऊस न झाल्याने ७० टक्के क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना वन्य प्राणी सतावत आहेत.