'भारतीय नौदलाला छत्रपती शिवरायांची प्रेरणा'; कॅप्टन इंद्रनील अवस्थी यांचे प्रतिपादन

By रवी दामोदर | Published: July 12, 2024 05:18 PM2024-07-12T17:18:20+5:302024-07-12T17:19:45+5:30

‘महानेव्ही कनेक्ट २०२४’चे अकोला शहरात स्वागत.

chhatrapati shivaji maharaj inspiration to the indian navy assertion by captain indranil awasthi in akola | 'भारतीय नौदलाला छत्रपती शिवरायांची प्रेरणा'; कॅप्टन इंद्रनील अवस्थी यांचे प्रतिपादन

'भारतीय नौदलाला छत्रपती शिवरायांची प्रेरणा'; कॅप्टन इंद्रनील अवस्थी यांचे प्रतिपादन

रवी दामोदर, अकोला  : छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे प्रेरणास्थान आहेत. भारतीय नौदलाची अतुलनीय कामगिरी ही जगभरात शौर्य व पराक्रमाचे प्रतीक ठरली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नौसेना कॅप्टन इंद्रनील अवस्थी यांनी दि.१२ जूलै रोजी केले.

भारतीय नौदलाबाबत विद्यार्थी, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने वसई येथून ८ जुलै रोजी नौदलातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘महानेव्ही कनेक्ट कार रॅली’चे अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयात उत्साहात स्वागत करण्यात आले, त्यावेळी कॅप्टन अवस्थी यांनी युवकांशी संवाद साधला. प्राचार्य अंबादास कुलट यांच्यासह अनेक मान्यवरांनी रॅलीचे स्वागत केले.

महाराष्ट्र नौसेना कॅप्टन इंद्रनील अवस्थी,कमांडर क्षितिज प्रसाद, सर्जन लेफ्टनंट कमांडर अर्शित आंग्रे, लेफ्टनंट कमांडर अक्षय रोझारिवो, लेफ्टनंट आस्था कंबोज, लेफ्टनंट अर्थव भोकारे, ११ महाराष्ट्र एनसीसी सुभेदार मेजर अशोक कुमार, अग्निवीर हर्षाली कोर, देवांशी कुळसंगे, सहायक जिल्हा कल्याण अधिकारी सतीश रासकर, तेजराव निखाडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कॅप्टन अवस्थी यांनी यावेळी उपस्थितांना नौदलाचा इतिहास, कार्य, यंत्रणा, आतापर्यंत पार पाडलेल्या महत्वाच्या कामगिरी आदी विविध बाबींची माहिती दिली. नौदलात सेवेची संधी उपलब्ध असून, अधिकाधिक युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

४,२१० कि.मी.चे अंतर कापून मुंबई येथे होणार समारोप ‘महानेव्ही कनेक्ट कार रॅली वसई,नाशिक, धुळे,जळगाव अकोलामार्गे नागपुर, पुण्यासह २५ महत्वाच्या शहरांना भेट देत ४ हजार २१० किमीचे अंतर कापून विविध जिल्ह्यांत नौदलाचे कार्य, भूमिका, जबाबदारी, तसेच तरूणांना नौदलात सेवेची संधी आदींबाबत जनजागृती करीत आहे. कार रॅली महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांना भेटी देणार असून, समारोप मुंबई येथे होणार आहे.

Web Title: chhatrapati shivaji maharaj inspiration to the indian navy assertion by captain indranil awasthi in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.