वॉटर कपसाठी गावांमध्ये चुरस

By admin | Published: May 4, 2017 12:48 AM2017-05-04T00:48:04+5:302017-05-04T00:48:04+5:30

अकोला : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हयातील अकोट , बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात जलसंधारणाची कामे सुरू असून नागरिक मोठ्या संख्येने श्रमदान करीत आहेत.

Chicks in the villages for the water cup | वॉटर कपसाठी गावांमध्ये चुरस

वॉटर कपसाठी गावांमध्ये चुरस

Next

गावोगावात नागरिक करताहेत स्वयंस्फूर्तीने श्रमदान

अकोला : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हयातील अकोट , बार्शीटाकळी व पातूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे सुरू असून त्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने श्रमदान करीत आहेत.

स्पर्धेत नसतानाही हिंगणा गावात झाले श्रमदान
शिर्ला : पातूर तालुक्यामध्ये सध्या वॉटर कप स्पर्धेनिमित्ताने अनेक गावात श्रमदानातून जलसंधारणाची कामे जोरात सुरू आहेत. या स्पर्धेत तालुक्यामधील ३५ गावे सहभागी झालेली आहेत; पण या स्पर्धेत सहभागी झाले नसलेल्या हिंगणा गावातील नागरिकांनी देखील जलसंधारणाची कामे करण्यासाठी पुढाकार घेऊन २ मे रोजी श्रमदानास प्रारंभ केला.
हिंगणा गावाची निवड या स्पर्धेसाठी झाली होती; परंतु त्यानंतर गावातील कुणीही वॉटर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी गेले नव्हते. त्यामुळे हे गाव स्पर्धेमधून बाद झाले होते; परंतु गावातील काही युवक सातत्याने पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक कोल्हे, नानवटे व शिर्ला येथे वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदान करणाऱ्या टीमच्या संपर्कात होतेच. त्यांनी शिर्ला, चारमोळी, गोंधळवाडी या गावात होत असलेल्या श्रमदानाच्या कार्यापासून प्रेरणा घेत हिंगणा गावातील शाळकरी मुलांसह युवकांनी दुष्काळावर मात करण्याचे ठरवून २ मेपासून हिंगणावासीयांनी जलसंधारणासाठी श्रमदानाच्या कार्यास प्रारंभ केला. पहिल्याच दिवशी गावाजवळच्या गायरानात वृक्ष लागवडीसाठी खड्डे, मोठमोठ्या झाडांसाठी खोल आळे खोदत सकाळी ६.१५ वाजतापासून ते ९ वाजेपर्यंत अंदाजे दीड ते दोन लाख लीटर्स पाणीसाठा होईल, एवढे काम केवळ १० ते १२ जणांनी पूर्ण केले.

जलसंधारणासाठी बालकही सरसावले
पातूर : पातूर तालुक्यातील अंधार सांगवी येथे २८ एप्रिल रोजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी जलसंधारणाच्या कामात सहभाग घेऊन श्रमदान केले. बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनीही श्रमदान केले. यावेळी गावातील नागरिक, महिला, तरुणसुद्धा श्रमदानात सहभागी झाले होते.
पातूर तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत तालुक्यातील शिर्ला, गोंधळवाडी, चारमोळी, अंधार सांगवी यासह स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावातील गावकरी जिद्द, चिकाटी व कष्टाने जलसंधारणाची कामे करीत आहेत. त्यामध्ये पुरुष, महिला, तरुणासह लहान-लहान मुलेसुद्धा सहभागी होत आहेत. तालुक्यातील जांभरूण गावात चिमुकल्या जलसैनिकांनी त्यांच्या नावाचे दगडी बांध बांधले आहेत. या बालकांचे काम कौतुकास्पद असून, इतरांना प्रेरणा देणारे आहे.

ग्रामसेवकाने खोदले ५०१ खड्डे
शिर्ला : शिर्लाच्या दुष्काळमुक्तीसाठी महिन्याचा पूर्ण पगार देणारे राहुल उंदरे यांनी एकट्याच्या श्रमदानातून वृक्षारोपणासाठी ५०१ खड्डे पूर्ण करण्याचा प्रेरणादायी विक्रम केला आहे.
राज्यातील ३० तालुक्यांतील वॉटर कप स्पर्धेतील आगळा वेगळा विक्रम ग्रामसेवक राहुल उंदरे यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. राहुल उंदरे शिर्ला ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आहेत. दररोज सकाळी गावकऱ्यांसोबत श्रमदान करतात. सायंकाळी संकल्प केलेले खड्डे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त श्रम करतात. एरव्ही ग्रामसेवक मुख्यालयाच्या गावी शोधून सापडत नाहीत. मात्र, राहुल उंदरे श्रमदानाबरोबरच लोकांची शासकीय कामे मोहीम स्थळी करतात. तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले होते.

Web Title: Chicks in the villages for the water cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.