मुख्यमंत्री ११ फेब्रुवारीला अकोल्यात!

By admin | Published: January 25, 2016 02:17 AM2016-01-25T02:17:24+5:302016-01-25T02:17:24+5:30

शासकीय इमारतीच्या उद्घाटनासह विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री लावणार हजेरी.

Chief Minister on February 11 Akolatan! | मुख्यमंत्री ११ फेब्रुवारीला अकोल्यात!

मुख्यमंत्री ११ फेब्रुवारीला अकोल्यात!

Next

अकोला: जिल्हा व महानगरातील विकासकामांना चालना देण्यासाठी तसेच कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ फेब्रुवारी रोजी अकोला येथे असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी दिली. सोमवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता विशेष विमानाने मुख्यमंत्र्यांचे अकोल्यात आगमन होईल. सकाळी १0 वाजता शासकीय इमारतींचे भूमिपूजन व उद्घाटन तसेच आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या विशेष प्रयत्नाने आलेल्या निधी अंतर्गत अकोला महानगरातील विविध कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते राज्य व केंद्र शासनाच्या कामकाजाची माहिती देणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याची भाजपतर्फे तयारी सुरू झाली आहे. खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, राज्यमंत्री रणजित पाटील, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, महापौर उज्ज्वला देशमुख, रमण जैन, हरीश आलिमचंदानी, योगेश गोतमारे, विजय अग्रवाल, सिद्धार्थ शर्मा, सुमनताई गावंडे, अनिल गावंडे, विलास पोटे, योगेश नाठे, सुदेश शेळके, प्रकाश श्रीमाळी, गजानन भटकर, भारत भगत, अरविंद महल्ले, विजय परमार, राजेंद्र गिरी, नीलेश निनोरे, उकंडराव सोनोने, वसंत बाछुका, गोपाल खंडेलवाल, डॉ. अशोक ओळंबे, संतोष पांडे, दीपक मायी, डॉ. युवराज देशमुख, बाळ ताले, धनंजय गिरिधर, सुरेश अंधारे, सचिन पाटील, दिगंबर गावंडे, ओमप्रकाश मंत्री, लता गावंडे, श्रीकृष्ण मोरखडे, दिलीप सागळे, संदीप उगले, राजेश रावणकर, राजू नागमते, राजा राजनकर आदी कार्यकर्ते तसेच विविध समित्या व आघाड्यांचे कार्यकर्ते आयोजनाकरिता परिश्रम घेत आहेत.

Web Title: Chief Minister on February 11 Akolatan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.