मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना : वीज जोडणीसाठी १५ दिवसांत २८ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 06:26 PM2019-02-05T18:26:10+5:302019-02-05T18:26:16+5:30

अकोला : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून, या योजनेस राज्यातील शेतकºयांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

Chief Minister Solar agri pump scheme: 28 thousand application for connection | मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना : वीज जोडणीसाठी १५ दिवसांत २८ हजार अर्ज

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना : वीज जोडणीसाठी १५ दिवसांत २८ हजार अर्ज

Next

अकोला : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून, या योजनेस राज्यातील शेतकºयांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. महावितरणने पोर्टल सुरु केल्यानंतर केवळ पंधरा दिवसात सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी सुमारे २८ हजार शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकºयांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा शेतकºयांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. महावितरणच्या पोर्टलवरून अर्ज केलेल्या २६ हजार शेतकºयांपैकी २ हजार शेतकºयांच्या शेतजमिनीचा सर्व्हे करण्यात आलेला असून २ हजार २९३ शेतकºयांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. याशिवाय अर्ज भरतांना काही त्रुटी असलेल्या ४१९ अर्ज सध्या नामंजूर करण्यात आले असून या शेतकº्यांनी अर्जातील माहिती दुरूस्त करून आपले अर्ज पुन्हा महावितरणच्या पोर्टलवरून भरावेत.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकºयांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका व व्हॉट्स अँप अशा माध्यमांचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील सर्व कर्मचारी व अभियंते सोशल माध्यमांद्वारे शेतकºयांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकºयांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेतकº्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचा लाभ घेत २ फेब्रुवारी २०१९ पर्यन्त राज्यातील सुमारे २८ हजार शेतकºयांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. विशेषत: मराठवाड्यातील शेतकºयांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून मागील पंधरा दिवसात १६ हजार ९६० शेतकºयांनी आपले अर्ज या पोर्टलवरून भरले आहेत. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

Web Title: Chief Minister Solar agri pump scheme: 28 thousand application for connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.