मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना; लाभार्थी हिस्सा भरावा लागणार कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 04:19 PM2019-02-16T16:19:04+5:302019-02-16T16:19:33+5:30
अकोला: शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे दिवसाही वीज पुरवठा उपलब्ध करून देणाºया मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील लाभार्थींना त्यांच्या हिश्शाची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे.
अकोला: शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे दिवसाही वीज पुरवठा उपलब्ध करून देणाºया मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील लाभार्थींना त्यांच्या हिश्शाची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे.
शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मान्यता दिली. त्यानंतर या निविदेद्वारे निश्चित झालेली कृषी पंपाची किंमत ३ एचपी डीसीसाठी १ लाख ६५ हजार ५९४ व ५ एचपी डीसीसाठी २ लाख ४७ हजार १०६ एवढी आहे. ही रक्कम पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याने शेतकºयांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पूर्वी ३ एचपी डीसी पंपासाठी आधारभूत किंमत २ लाख ५५ हजार व ५ एचपी डीसी पंपासाठी ३ लाख ८५ हजार होती.
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना पूर्वी ३ एचपीसाठी २५ हजार ५०० (१० टक्के) तर अनुसूचित जाती-जमाती गटातील लाभार्थींना १२ हजार ७२५ एवढी रक्कम भरावी लागत होती. ती रक्कम आता अनुक्रमे १६ हजार ५६० व ८ हजार २८० एवढी भरावी लागणार आहे, तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना पूर्वी ३८ हजार ५०० (१० टक्के) तर अनुसूचित जाती-जमाती गटातील लाभार्थींना १९ हजार २५० एवढी रक्कम भरावी लागत होती. आता अनुक्रमे २४ हजार ७१० व १२ हजार ३५५ एवढी रक्कम भरावी लागणार आहे.
६४ हजार ९३८ शेतकºयांचे अर्ज
ज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे, तसेच ज्या शेतकºयांनी यापूर्वी कृषी पंपांसाठी वीज जोडणी घेतली नाही किंवा वीज जोडणीचे पैसे भरून त्यांची वीज जोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यभरातील सुमारे ६४ हजार ९३८ शेतकºयांचे अर्ज मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी प्राप्त झाले असून, त्यापैकी १७ हजार ०१६ शेतकºयांना कोटेशनही देण्यात आले आहे.
‘आपल्या दारी’ योजनेतील लाभार्थींनाही मिळणार वीज जोडणी!
महावितरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ज्या शेतकºयांना केबलद्वारे वीज पुरवठा देण्यात आला होता, अशा शेतकºयांची पायाभूत यंत्रणा उभारून कायमस्वरूपी वीज पुरवठा देण्याबाबत मागणी आल्याने त्यांनाही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत आॅनलाइन अर्ज करून सहभागी करून घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.