मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना; दहा दिवसांत ८ हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 06:24 PM2019-01-29T18:24:58+5:302019-01-29T18:25:25+5:30

अकोला : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकºयांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून, या योजनेस राज्यातील शेतकºयांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Chief Minister solar agripump scheme; 8 Thousand Farmers' application | मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना; दहा दिवसांत ८ हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना; दहा दिवसांत ८ हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज

Next

अकोला : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकºयांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून, या योजनेस राज्यातील शेतकºयांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणने पोर्टल सुरु केल्यानंतर केवळ दहा दिवसात सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी ८ हजार ६८५ शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये अमरावती विभागातील १२६८ शेतकºयांचा समावेश आहे.
शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकºयांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा भागात वीजजोडणीची मागणी करणाº्या सर्व शेतकºयांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकºयांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका तयार केली असून या पुस्तिकेचे वितरण सर्वत्र करण्यात येत आहे. याशिवाय योजनेची माहिती शेतकºयांना व्हावी यासाठी महावितरणतर्फे मोठ्याप्रमाणात व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सोशल माध्यमांद्वारे शेतकºयांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकºयांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेतकº्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ घेत दि. २९ जानेवारी २०१९ पर्यन्त राज्यातील सुमारे ८ हजार ६८५ शेतकºयांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. विशेषत: मराठवाड्यातील शेतकºयांकडून या योजनेला मोठाप्रतिसाद मिळत असून मागील दहा दिवसात ५ हजार ४४६ शेतकºयांनी आपले अर्ज या पोर्टलवरून भरले आहेत. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकº्यांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

अमरावती विभागातील शेतकºयांचे जिल्हानिहाय अर्ज
जिल्हा                          अर्ज
अकोला                         ८१
अमरावती                     ८९
बुलडाणा                       १७७
वाशिम                         ७९३
यवतमाल                    १२८
-------------------------------------------
एकूण                           १२६८

 

Web Title: Chief Minister solar agripump scheme; 8 Thousand Farmers' application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.