मुख्यमंत्री घेणार पाच जिल्ह्यांतील समस्यांचा आढावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:50 PM2017-12-05T12:50:18+5:302017-12-05T12:56:01+5:30

अकोला : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील विविध समस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत. त्यानुषंगाने विभागात प्रशासनामार्फत जिल्हानिहाय संबंधित मुद्यांची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

Chief Minister will review the problems in five districts! | मुख्यमंत्री घेणार पाच जिल्ह्यांतील समस्यांचा आढावा!

मुख्यमंत्री घेणार पाच जिल्ह्यांतील समस्यांचा आढावा!

googlenewsNext
ठळक मुद्देया बैठकीला प्रत्येक जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाºयांसह विभागप्रमुख अधिकारी उपस्थित राहणार प्रशासनामार्फत जिल्हानिहाय संबंधित मुद्यांची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

- संतोष येलकर

अकोला : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील विविध समस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत. त्यानुषंगाने विभागात प्रशासनामार्फत जिल्हानिहाय संबंधित मुद्यांची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.
विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत राबविण्यात येणाºया विविध योजनांची अंमलबजावणी, विकास कामांची सद्यस्थिती आणि विविध समस्या व अडचणींच्या मुद्यांवर मुख्यमंत्री जिल्हानिहाय आढावा बैठका घेणार आहेत. या बैठकीला प्रत्येक जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाºयांसह विभागप्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार असल्याच्या पृष्ठभूमीवर विभागातील पाचही जिल्ह्यांत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चिल्या जाणाºया विविध मुद्यांची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पालकमंत्री आणि जिल्हाधिकाºयांकडून आढावा बैठकांद्वारे संबंधित मुद्यांवर आढावा बैठका घेण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून ‘या’ मुद्यांचा घेण्यात येणार आढावा!
विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनात मागील वर्षी आढावा बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या इतिवृत्तांची जिल्हानिहाय अंमलबजावणी, मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत कामांचे उद्दिष्ट व साध्य, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमधील विकास कामांची सद्यस्थिती, कर्जमाफी योजनेंतर्गत कामाची प्रत्यक्ष स्थिती, महामार्ग रस्त्यांची स्थिती व दुरुस्ती आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची स्थिती व दुरुस्तीची कामे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कामांची सद्यस्थिती, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प आणि प्रस्तावित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपांसाठी पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करणे, शेतकरी आत्महत्या प्रकरणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत कामांची सद्यस्थिती, विशेष प्रकल्पांतर्गत कामे इत्यादी मुद्यांसह विविध समस्या आणि अडचणींसंदर्भात जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हानिहाय बैठकांचे असे आहे वेळापत्रक!
मुख्यमंत्री जिल्हानिहाय आढावा बैठका घेणार आहेत. त्यामध्ये ११ डिसेंबर रोजी अमरावती, १२ डिसेंबर रोजी अकोला व वाशिम आणि १९ डिसेंबर रोजी बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्याची आढावा बैठक मुख्यमंत्री घेणार आहेत. या सर्व आढावा बैठका दुपारी ३ वाजता नागपूर येथील मंत्रालयात मुख्यमंत्री घेणार आहेत. लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकारी या बैठकांना उपस्थित राहणार आहेत.

 

Web Title: Chief Minister will review the problems in five districts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.