पीक परिस्थितीचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा!

By admin | Published: August 6, 2016 02:03 AM2016-08-06T02:03:08+5:302016-08-06T02:03:08+5:30

‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे राज्यातील पीक परिस्थितीसह विविध कामांचा आढावा घेतला.

Chief Secretary took the peak situation review! | पीक परिस्थितीचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा!

पीक परिस्थितीचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा!

Next

अकोला, दि. ५: राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी शुक्रवारी ह्यव्हिडिओ कॉन्फरन्सह्णद्वारे राज्यातील पीक परिस्थितीसह विविध कामांचा आढावा घेतला. त्यामध्ये जिल्हय़ातील पीक परिस्थितीसह धरणातील जलसाठा व नैसर्गिक आपत्तीमुळे मृतकांच्या कुटुंबीयांना मदत कार्याचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला.
जिल्हय़ात झालेला पाऊस, खरीप पिकांची स्थिती, धरणांमधील उपलब्ध जलसाठा, पुरात वाहून गेलेल्या मृतकांच्या कुटुंबीयांना मदत, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ातील कामे, टंचाई निवारणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची कामे, आधार नोंदणी आदी कामांचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. तसेच विविध विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या योजना आणि कामांची माहिती मुख्य सचिवांनी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम. कोपूलवार, कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Chief Secretary took the peak situation review!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.