केरळ पूरग्रस्तांसाठी चिखलगाव ग्रामस्थ, मोरगाव सादीजनचे विद्यार्थी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:57 PM2018-08-29T17:57:02+5:302018-08-29T18:00:03+5:30

अकोला : केरळ येथील पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील ग्रामस्थांनी जमा केलेली ६ हजार ६८६ इतकी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षाच्या माध्यमातून आॅनलाईन जमा केली.

Chikhalgaon villagers, Morgaon student help for Kerala flood victims | केरळ पूरग्रस्तांसाठी चिखलगाव ग्रामस्थ, मोरगाव सादीजनचे विद्यार्थी सरसावले

केरळ पूरग्रस्तांसाठी चिखलगाव ग्रामस्थ, मोरगाव सादीजनचे विद्यार्थी सरसावले

googlenewsNext
ठळक मुद्देओवाळणीची १५०० रुपये इतकी रक्कम शाळेच्या शिक्षकांनी मदत कक्षाच्या माध्यमातून आॅनलाईन जमा केली. याबाबतचे प्रमाणपत्र अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शिक्षकांना दिले.

अकोला : केरळ येथील पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील ग्रामस्थांनी जमा केलेली ६ हजार ६८६ इतकी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षाच्या माध्यमातून आॅनलाईन जमा केली. याबाबतचे पत्र ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांना दिले. तसेच, बाळापूर तालुक्यातील मोरगाव सादीजन येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाची सामुहिकरित्या जमा केलेली ओवाळणीची १५०० रुपये इतकी रक्कम शाळेच्या शिक्षकांनी मदत कक्षाच्या माध्यमातून आॅनलाईन जमा केली. याबाबतचे प्रमाणपत्र अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शिक्षकांना दिले. यावेळी गुणवत्ता शिक्षण विभागाचे प्रकाश अंधारे व जिल्हा हेल्प डेस्कचे प्रसाद रानडे उपस्थित होते.
केरळ राज्यात अतिवृष्टीमुळे महाप्रलयकारी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे या राज्यातील पुरग्रस्तांना भरीव मदत करण्याकरीता अकोला जिल्हयातील नागरिकांनी व सर्वच घटकातील व्यक्तींनी सहृदयतेने यथाशक्य आर्थिक मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहे.
दरम्यान, आर्थिक मदतीकरीता आॅनलाईन पैसे भरण्याची सुविधा केरळ शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. ह्यमुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीह्ण (सीएमडीआरएफ) या नावाने निधी पाठविता येणार आहे. सदर आॅनलाईन पध्दतीने पैसे भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील शैक्षणिक गुणवत्ता कक्ष येथे मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षात हर्षदा काकड, प्रकाश अंधारे, प्रसाद रानडे, विशाल ढाकरगे, सचिन भांबेरे, संतोष इंगळे, हितेश राऊत, प्रसाद देशमुख यांचा समावेश आहे.सदर मदत निधी हा शंभर टक्के करमुक्त आहे.

 

Web Title: Chikhalgaon villagers, Morgaon student help for Kerala flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.