बालगृहातील मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातून आला होता अकाेल्यातील बालगृहात
By सचिन राऊत | Published: August 12, 2023 12:07 PM2023-08-12T12:07:05+5:302023-08-12T12:07:32+5:30
मलकापूर राेडवर असलेल्या बालगृहातील एका १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
अकाेला : मलकापूर राेडवर असलेल्या बालगृहातील एका १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी खदान पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करीत तपास सुरू केला आहे. या मुलाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, अहवाल आल्यानंतर या घटनेचे नेमके कारण समाेर येणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
पुण्यातील बालगृहात असलेला एक १५ वर्षीय मुलगा काही दिवसांपूर्वीच मलकापूर राेडवर असलेल्या बालगृहात आला हाेता. या ठिकाणी आल्यापासूनही ताे शांत राहत असल्याने त्याच्याशी बाेलण्याचा प्रयत्न संबंधितांकडून करण्यात येत हाेता.
मात्र सतत मग्न राहत असलेल्या या मुलाने गुरुवारी दळण काढण्यासाठी चक्कीत जात असल्याचे सांगत या चक्कीचे दार आतून लावले व गळफास घेतला. आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणाची खदान पाेलिसांनी पंचनामा केला असून, तपास सुरू केला आहे.