बालकाचा डायरियाने मृत्यू
By admin | Published: April 9, 2016 01:36 AM2016-04-09T01:36:38+5:302016-04-09T01:36:38+5:30
वाशिम जिल्ह्यातील पोहा येथे डायरियाचा उद्रेक.
पोहा (वाशिम): कारंजा तालुक्यातील पोहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या वढवी येथील डायरियाची लागण झालेल्या चेतन संजय चौधरी या ११ वर्षीय मुलाचा ८ एप्रिल रोजी उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला.
कारंजा तालुक्यातील वढवी येथे डायरियाचा उद्रेक झाला असून, ५0 जणांना या आजाराची लागण झाली आहे. चेतन चौधरी याला ५ एप्रिल रोजी डायरियाची लागण झाल्यामुळे त्याला सर्वप्रथम कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्याला तातडीने नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.