बैलगाडीखाली दबल्याने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 17:50 IST2019-07-27T17:50:16+5:302019-07-27T17:50:19+5:30
विझोरा-बैलगाडीखाली दबल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना गोरव्हा येथे २६ जुलै रोजी सायंकाळी घडली.

बैलगाडीखाली दबल्याने बालकाचा मृत्यू
विझोरा-बैलगाडीखाली दबल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना गोरव्हा येथे २६ जुलै रोजी सायंकाळी घडली. श्रीहरी रुपेश पवार असे मृतक बालकाचे नाव आहे.
गोरव्हा येथे श्रीहरी पवार हा मुलगा बैलगाडीवर खेळत होता. यावेळी तो बैलगाडीच्या मागील लोखंडी कळीला लटकला असता बैलगाडी त्याच्या अंगावर आदळली. घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे नेले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.(वार्ताहर)