शेतकऱ्यांच्या मुलांनी लघुपटातून मांडले वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:19 AM2021-01-03T04:19:37+5:302021-01-03T04:19:37+5:30

अकोट : दुष्काळ, नापिकी, निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर काेराेना काळात आभाळच काेसळले. पण शेतकरी बांधवांनी परिस्थितीशी दाेन ...

The children of farmers presented the reality through a short film | शेतकऱ्यांच्या मुलांनी लघुपटातून मांडले वास्तव

शेतकऱ्यांच्या मुलांनी लघुपटातून मांडले वास्तव

Next

अकोट : दुष्काळ, नापिकी, निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर काेराेना काळात आभाळच काेसळले. पण शेतकरी बांधवांनी परिस्थितीशी दाेन हात करीत अविरत काम सुरू ठेवून जगाच्या पाेशिंद्याची भूमिका पार पाडली. काेराेनाच्या संकटात अनेक काेराेना याेद्ध्यांचे काैतुक झाले, मात्र बळीराजा दुर्लक्षित राहिला. काेराेना संकट काळातील शेतकऱ्यांचे वास्तव अकाेट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनीच लघुपटाच्या माध्यमातून समाेर आणले आहे.

कोरोना या जागतिक आरोग्य संकटातील घटनेवर आधारित ग्रामीण भागातील वास्तव मांडत सामाजात जनजागृती तसेच शेतकरी कुटुंब व गावाचा सामाजिक संदेश देणारा ‘कोरोना टू गाव’ या लघुपटाची निर्मिती अकोट कला मंचने केली आहे. नुकताच या लघुचित्रपटाचे प्रदर्शन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. या अस्सल लघुचित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या लाइव्ह प्रदर्शन कार्यक्रमाला तीन हजारांच्या वर प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली.

अकोट येथील कला मंचचे योगेश वाकोडे या युवकाने लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात बहुतांश शेतकऱ्यांच्या मुलांनी अभिनय केला असून, कोणताही खर्च व उत्पन्नाचे साधन म्हणून हा लघुचित्रपट बनविण्यात आलेला नाही. या जनजागृती लघुचित्रपट माध्यमातून काही शेतकरी कुटुंबांतील वास्तव, शेतीचे महत्त्व हे कोरोना या महामारी संकटात उजळून निघाले. नोकरी व लग्नाची चिंताजनक परिस्थिती व काही मुलींचा शेतकरी नवऱ्याबद्दलचा दृष्टिकोन पाहता शेतीचे महत्त्व, कोरोनापासून प्रत्येकाचे आरोग्य, गावाचा विकास, गावात आपुलकी, काळजी-स्नेहाचे नाते, शहर व गावातील हवा, पाणी बदल रेखाटला आहे. या लघुपटातील संवाद ओघवत्या भाषेत आहेत. तालुक्यातील पिंप्री जैनपूर या गावात चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले असून शेतकरी कुटुंब व बहुतांश गावकऱ्यांचा त्यात समावेश आहे. समाजासाठी जनजागृती म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाने स्वतःजवळील साधनसामग्री वापरत योगदान दिले आहे.

यांनी घेतला पुढाकार

कोरोना-टु-गाव या लघुचित्रपटाचे निर्माता - योगेश वाकोडे, दिग्दर्शक - विश्वास आप्पा कुरवाडे, हरीश ढवळे, कथालेखक - विजय शिंदे, साहाय्यक - संदीप ढोक, आदर्श अग्रवाल, रवी पवार, परीक्षित बोचे, अमोल नगरे, मोहन परळकर, महेंद्र सोनोने, विशाल तट्टे, अतुल मानकर तसेच अभिनय - गीताआई भगत, भास्कर उर्फ बाबासाहेब भगत, भोजराज भगत, विजय शिंदे, अनंता भगत, ज्ञानेश्वर पखान, प्रशांत भगत, गौरव भगत, दीपक भगत, गोवधन बानेरकर, श्याम कोल्हे, नामदेव बानेरकर, वैभव भगत यांचा असून अरविंद बानेरकर, लकी इंगळे यांनी या लघुपटासाठी पुढाकार घेतला.

Web Title: The children of farmers presented the reality through a short film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.