कचरा वेचणा-याच्या आयुष्यात मुलांच्या रूपाने अरुणोदय!

By admin | Published: October 12, 2015 01:49 AM2015-10-12T01:49:42+5:302015-10-12T01:49:42+5:30

कचरा वेचणा-याची मुले झाली उच्चशिक्षित.

Children in the life of garbage waste, Dawn! | कचरा वेचणा-याच्या आयुष्यात मुलांच्या रूपाने अरुणोदय!

कचरा वेचणा-याच्या आयुष्यात मुलांच्या रूपाने अरुणोदय!

Next

नितीन गव्हाळे / अकोला: कुडा कचरा वेचता-वेचता आयुष्याचाच कचरा झाला. कचरा हेच आपलं जीवन. लोकांच्या दारोदार जाऊन कुडाकचरा गोळा करून संसाराचं रहाटगाडं ओढतो आहे; परंतु ही परिस्थिती आपल्या मुलांवर ओढवू नये, त्यांचं जीवनही आपल्यासारखंच कचर्‍यात जाऊ नये. त्यासाठी त्यांना शिकविलं पाहिजे, या विचाराने एक बा प झपाटतो आणि दिवसाला १२-१४ तास काम करून मेहनतीनं आपल्या तीनही मुलांना शिकवितो. त्यांना उच्चशिक्षित बनवितो. मुलांनीही बापाच्या संघर्षाची, परिस्थितीची जाणीव ठेवून शिक्षण घेतलं आणि कचरा वेचणार्‍या बापाच्या आयुष्यात अरुणोदयाची पहाट आणली.
कचरा वेचून मुलांना प्रज्ञावंत बनवणारा हा बाप आहे, अरुण यशवंत बागडे. अरुणभाऊ व त्यांची पत्नी माया हे दोघेही अल्पशिक्षित. त्यांचे वडील सावतराम मिलमध्ये कामाला होते. घरची परिस्थिती गरिबीची. दोन मुले, एक मुलगी असा संसार. दररोज पहाटे उठून कचरा गाडी घ्यायची आणि मोरेश्‍वर कॉलनी, वृंदावननगर, खेडकरनगर, राऊतवाडी परिसरातील दारोदार फिरायचं. घरातील कुडाकचरा गोळा करायचा. कचरा गाडीत टाकायचा. यातून कसातरी उदरनिर्वाह भागायचा. पंधरा वर्षांंपासून नित्यनेमाने अरुणभाऊ हे काम करीत आहे त. आपल्या नशिबी कचर्‍यात जगण्याचं आयुष्य आलं; परंतु आपल्या मुलांच्या नशिबी हे येऊ नये, यासाठी अरुणभाऊंनी मुला-मुलीला चांगल्या शाळेत टाकलं. त्यांना शिकविलं. मुलंही हुशार निघाली. त्यांची बुद्धिमत्ता ओळखून अरुणभाऊंनी त्यांना काहीही कमी पडू दिलं नाही. दाढी वाढलेला त्यांचा चेहरा, बनियानला पडलेली भोकं. त्यांच्या नशिबाची कथा कथन करतात. मुलांनीही बापाच्या मेहनतीची, त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवत स्वत:ला झोकून दिलं आणि त्या बापाचे नाव सार्थ ठरवित, खर्‍याअर्थाने अरुणोदयाची पहाट उजाडली. मोठी मुलगी कोमल ही एमए प्रथम वर्षाला शिकते आहे. दुसरा मुलगा अमर हा औरंगाबादला बीई सिव्हिलच्या द्वितीय वर्षाला शिकतो आणि धाकटा देवाशिष इयत्ता १२ वीत आहे. तो कुस्ती व ज्युदोपटू आहे. उद्या ही मुले शिकून इंजिनिअर, अधिकारी होतील. कचरा, वेचता-वेचता कचर्‍यातूनच अरुणभाऊंनी ज्ञानरूपी फुले.. उगवली. म्हणूनच ही खचलेल्या, गरिबीच्या गर्तेत दिवस काढणार्‍यांसाठी प्रेरणावाट आहे.

*मोरेश्‍वर फाऊंडेशनने बनवून दिला स्वच्छता रथ
अरुणभाऊ दारोदार फिरून कचरा गोळा करतात. त्यांची कचरा गाडी ठिकठिकाणी मोडकळीस आली होती. त्यातून कचरा सांडायचा. ही परिस्थिती मोरेश्‍वर फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत पागृत यांनी पाहिली. त्यांनी परिसरातील नागरिकांना ही बाब सांगितली. श्रीकांतभाऊसह डॉ. केशव मेहरे, नामदेव पागृत, छोटू ढेगळे, मनोहर देशमुख, सुरेश सागळे, गोपाल घुले, बाबाराव गोरे, गणेश उमाळे, डॉ. इंगळे, हरिदास लकडे, विश्‍वनाथ गांजरे, शेषराव काळे, रवींद्र लिखार, संदीप वाघडकर, शेखर ठाकरे, विशाल युतकार, छोटू देशमुख, डिक्कर, डॉ. राजेंद्र ढवळे, प्रशांत ठाकरे, पिंटू वानेडकर, प्रभंजन निमकर्डे, अभिजित कौसल, सचिन काळे, विजय लोहित, पंकज साकला, गोकुळ भड, राजेश शिंदे, शेखर भड, अभिमन्यू ढेंगळे, राजेश देशपांडे, किशोर सपकाळ, समाधान शिंदे, भरत ढेंगळे, प्रणय देशमुख, श्रीकांत पाटील, किशोर काळे, राजेश भड, मनीष वाघुळदे, उल्हास पद्मवार, अनिल इचे आदींनी वर्गणी करून अरुणभाऊंना कचरागाडीची दुरुस्ती व डागडुजी करून नवीन कचरागाडी बनवून दिली.

Web Title: Children in the life of garbage waste, Dawn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.