लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडीमध्ये तिप्पट वाढ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:23 AM2021-08-20T04:23:35+5:302021-08-20T04:23:35+5:30
डेंग्यू, मलेरियाची चाचणी रुग्णालयांमध्ये दाखल बहुतांश बालरुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियाची लक्षणे दिसून येत आहेत. या आजाराचे निदान करण्यासाठी चिमुकल्यांच्या रक्ताचे ...
डेंग्यू, मलेरियाची चाचणी
रुग्णालयांमध्ये दाखल बहुतांश बालरुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियाची लक्षणे दिसून येत आहेत. या आजाराचे निदान करण्यासाठी चिमुकल्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहेत. त्या माध्यमातूनच बालरुग्णांना डेंग्यू किंवा मलेरिया आहे किंवा नाही याचे निदान केले जात आहे. त्यानुसारच रुग्णांवर उपचार केला जात असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
कोविडचीही चाचणी हवी
कोविडची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहे. अशात जिल्ह्यात चिमुकल्यांमध्ये व्हायरल तापाचे प्रमाण वाढले आहे.
बहुतांश रुग्णांमध्ये डेंग्यू, कोविडची लक्षणे दिसून येत असून त्याची चाचणीही केली जात आहे. मात्र, क्वचितच मुलांची कोविड चाचणी केली जात आहे. संभाव्य धोका पाहता लहान मुलांचीही कोविड चाचणी होणे आवश्यक आहे.
ही घ्या काळजी
घरात व परिसरात स्वच्छता बाळगा. डासांची उत्पत्ती होणार नाही, याची विशेष काळजी घ्या.
पिण्याचे पाणी स्वच्छ करूनच मुलांना प्यायला द्या. शक्य असल्यास पाणी उकळल्यानंतर थंड करुन ते पिण्यासाठी उपयोगात आणा.
मुलांना सकस आहार द्या. शक्यतोवर उघड्यावरील खाद्यपदार्थ देणे टाळा.
बालरोगतज्ज्ञ म्हणतात...
सद्यस्थितीत व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. बालरुग्णांचे प्रमाणही वाढले असून पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानंतरच औषधोपचारास सुरुवात करावी.
- डॉ. विनीत वरठे, बालरोग तज्ज्ञ, जीएमसी, अकोला
लहान मुलांमध्ये सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणे दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लक्षणे दिसताच पालकांनी मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार द्यावा.
- डॉ. अनुप चौधरी, बालरोगतज्ज्ञ, मनपा, अकोला