स्क्रीनटाइम वाढल्याने मुलांची चिडचिड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:14 AM2020-12-27T04:14:05+5:302020-12-27T04:14:05+5:30
आठ महिन्यांत काय बदल झाले मुलांचा स्क्रीनटाइम १२ तासांपेक्षा जास्त. पालक आणि मुलांमधील संवाद तुटला. अनेकांना डोळ्यांच्या समस्या वाढल्या. ...
आठ महिन्यांत काय बदल झाले
मुलांचा स्क्रीनटाइम १२ तासांपेक्षा जास्त.
पालक आणि मुलांमधील संवाद तुटला.
अनेकांना डोळ्यांच्या समस्या वाढल्या.
चिडचिड वाढली, एकटेपणा वाढला.
मैदानी खेळ बंद झाले.
त्यामुळे शारीरिक समस्याही निर्माण झाल्या.
पालकांसोबतच शिक्षकांसमोर मोठे आव्हान
सध्या मुलं तासंतास मोबाइलवर वेळ घालवत असल्याने अनेकांमध्ये आळस आणि एकटे राहण्याची सवय दिसून येत आहे; मात्र शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना या सवयी मोडाव्या लागणार आहेत. नियमित शाळा, शिस्तीचे पालन आणि मोबाइलपासून दूर राहणे या सर्व गोष्टी एकाच वेळी होणार असल्याने मुलांमधील चिडचिड वाढण्याची शक्यता आहे. यातून मुलांना बाहेर काढण्याचे पालकांसोबतच शिक्षकांसमोर मोठे आव्हान आहे.
मुलांचा स्क्रीनटाइम वाढल्याने या काळात मुलांमध्ये अनेक बदल दिसून आले. प्रामुख्याने १५ ते २० वर्षे वयोगटातील मुलांमध्ये जास्त बदल दिसून येत आहेत. मुलांमध्ये चिडचिड वाढली आहे. मुलांना मित्रांची कमी भासू नये, यासाठी पालकांनी मुलांना वेळ देणे आवश्यक आहे.
- डॉ. अनुप राठी, मनोविकार तज्ज्ञ, अकोला.