सततच्या लॉकडाऊनने वाढविले मुलांचे वजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:16 AM2021-03-24T04:16:57+5:302021-03-24T04:16:57+5:30

लॉकडाऊनला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरापासून लहान मुले घरातच बसून आहेत. पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ...

Children's weight increased due to continuous lockdown! | सततच्या लॉकडाऊनने वाढविले मुलांचे वजन !

सततच्या लॉकडाऊनने वाढविले मुलांचे वजन !

Next

लॉकडाऊनला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरापासून लहान मुले घरातच बसून आहेत. पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने अनेक पालकांनी मुलांना अंगणाच्या मर्यादेतच ठेवले आहे. मोबाईलवरच मुले घरबसल्या ऑनलाईन क्लास जाॅईन करतात; मात्र क्लास संपल्यावरही मोबाईल त्यांच्याच हाती असतो. ते मोबाईल गेम खेळण्यात व्यस्त होतात. व्यायामाला आणि खेळण्याला वाव नसल्याने मुलांचे वजन आणि मोबाईलचे व्यसनही वाढत आहे. ५ वर्षांपासून तर १६ वर्षापर्यंतच्या सर्वच वयोगटातील मुलांची ही समस्या आहे. शाळा बंद असणे आणि मैदानी खेळांची सवय तुटल्याने मुलांचे वजन आणि मोबाईलचे वेड वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. १३ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचे व्यसन तर एवढे वाढले आहे की, ते मोबाईलसाठी काहीही जोखीम घ्यायला तयार असतात. यामुळे घराघरांतील पालक काळजीत आहेत.

--बॉक्स--

मुलांनी हे करावे !

मुलांनी व्यायाम किंवा योगा करण्यासाठी काही वेळ काढावा, चेस बोर्ड, स्नेक ॲण्ड लॅडरसारखे खेळ बोर्डवर खेळावे, लंगडी, लिंबू-चमचा, रस्सीखेच, उठाबशा अशी कवायत करावे, यातून स्नायूंची शक्‍ती वाढते. घरांतील बगीच्याला पाणी घालावे, आपली बेडरूम स्वच्छ करणे, आपल्या कपड्याच्या घड्या करणे अशी घरातील छोटी-मोठी कामे करावी. घरचे साजूक जेवण करावे.

--बॉक्स--

मुलांनी हे टाळावे

फास्ट फूड खाणे टाळावे, साखरयुक्त आणि अतितळलेले पदार्थ खाऊ नका. जास्त वेळ मोबाईलवर गेम खेळणे व टीव्ही बघणे टाळावे, तासन्‌तास झोप काढणे किंवा बसून राहू नये. शरीराची हालचाल होत नसलेले गेम कमी खेळावे.

--कोट--

मैदानी खेळामुळे शारीरिक व्यायाम होतो. वजन कंट्रोल करण्यात व्यायाम आवश्यक आहे. लॉकडाऊनमुळे घरात राहावे लागत असल्याने मुले काही ना काही खात राहतात. तसेच ऑनलाईन शिक्षणामध्ये तीन-तीन तास बसून राहावे लागते. त्यामुळे वजन वाढत आहे. मुलांनी खाण्यावर नियंत्रण मिळवावे, शरीराचा व्यायाम होईल असे गेम्स खेळावे.

डॉ. आरती कुलवाल, बालरोगतज्ज्ञ

--कोट--

बाहेरील खेळ बंद आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मुलांचे वजन व चिडचिडेपणा वाढत आहे. ऑनलाईन शिक्षणात शारीरिक व्यायाम होत नाही. यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवून शाळा चालू करणे किंवा दररोज घरात एक तास व्यायाम व योगा करणे आवश्यक आहे.

डॉ. आनंद पांडव, बालरोगतज्ज्ञ.

Web Title: Children's weight increased due to continuous lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.