विजेचा शॉक लागल्याने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 08:09 PM2017-09-15T20:09:40+5:302017-09-15T20:14:20+5:30
आलेगाव : विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागल्याने ११ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना जांब येथे १५ सप्टेंबर रोजी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आलेगाव : विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागल्याने ११ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना जांब येथे १५ सप्टेंबर रोजी घडली.
जांब येथील प्रशांत संतोष करवते (११) हा जि. प. मराठी शाळेत पाचव्या वर्गात शिकत होता. तो त्याच्या मामाच्या घराच्या अंगणात शुक्रवारी सकाळी १0 वाजता खेळत अस ताना तेथे असलेल्या विद्युत खांबाच्या ताणाला त्याचा स्पर्श झाला व तो शॉक लागून जागेवरच कोसळला. त्यावेळी त्याला जवळ असलेल्या आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; परंतु वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन सरपंच जगदीश घायवट यांच्यासमोर पंचनामा केला, तसेच आलेगाव विद्युत उपकेंद्राचे उपअभियंता खंडारे यांनीसुद्धा घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
सदर घटनेच्या जागी भेट दिली असून, या घटनेबाबत वरिष्ठांना घटनेची माहिती दिली आहे. विद्युत निरीक्षक आल्यानंतरच वस्तुस्थिती कळेल. या भागात लहान गाव असल्यामुळे आकोडे टाकणार्यांची संख्या जास्त आहे. हा आदिवासी भाग आहे. आम्ही नेहमी आकोडे टाकणार्यांना पकडण्यासाठी रात्री किंवा दिवसा गेलो असता येथील काही नागरिक महावितरणची गाडी दिसताच आकोडे काढून घेता त. या लोकांना जागेवरच पैसे घेऊन मीटर ताबडतोब देण्याची योजना सुरू केली आहे.
बी. डी. खंडारे,
विद्युत महावितरण उपअभियंता, आलेगाव.