लग्नात बाेलावले नाही म्हणून अंगावर फेकली मिरची पावडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:19 AM2021-01-20T04:19:40+5:302021-01-20T04:19:40+5:30

अकाेला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहरपेठ येथील शेजारीच रहिवासी असलेल्या नातेवाईकांना मुलीच्या लग्नात बाेलावले नाही म्हणून लग्नातून ...

Chili powder thrown on the body as it did not burn at the wedding | लग्नात बाेलावले नाही म्हणून अंगावर फेकली मिरची पावडर

लग्नात बाेलावले नाही म्हणून अंगावर फेकली मिरची पावडर

Next

अकाेला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहरपेठ येथील शेजारीच रहिवासी असलेल्या नातेवाईकांना मुलीच्या लग्नात बाेलावले नाही म्हणून लग्नातून परत आलेल्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकल्याची घटना मंगळवारी घडली. त्यानंतर या नातेवाईकांनी ज्यांच्या मुलीचे लग्न हाेते तिच्या आईला व वडिलांना अश्लील शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याने तिघांविरुद्ध जुने शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुने शहरातील हरिहर पेठेतील गाडगेनगर येथील रहिवासी शारदाबाई कुंदनलाल बेटवाल (वय ४४) त्यांचे शेजारी राखी कठोरे, अशोक कठोरे, किशोर कठोरे हे असून त्यांचे नातेवाईकही आहेत. शारदाबाई यांच्या मुलीचे ५ जानेवारी रोजी लग्न झाले. त्या लग्नाला शेजारी असलेल्या तीन नातेवाईकांना बोलाविले नाही. म्हणून १७ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता शारदाबाई पतीसह घरी असताना राखी कठोरे, अशोक कठोरे, किशोर कठोरे हे घरासमोर आले व त्यांनी लग्नाला का बोलाविले नाही. या कारणावरून वाद घातला व शिवीगाळ केली. शारदाबाईच्या पतीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता तिघांनीही शिवीगाळ केली व किशोर कठोरे याने त्याच्या हातातील पाईपने उजव्या हातावर व पाठीवर मारहाण केली. तिघांनी शारदाबाई व त्यांच्या पतीला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व अंगावर मिरची पावडर फेकली. यासाेबतच शारदाबाईचे विक्रीला काढलेले घरही कसा विकता, असे म्हणत अशोक कठोरे याने धमक्या दिल्या. या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ३४, ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Chili powder thrown on the body as it did not burn at the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.