अपघातात चिमुकला ठार; दोन जखमी
By admin | Published: February 24, 2017 02:41 AM2017-02-24T02:41:54+5:302017-02-24T02:41:54+5:30
वारक-यांच्या ट्रॅक्टरला मालवाहू वाहनाची धडक
कवठा/ उरळ(अकोला), दि. २३- वाडी अदमपूर येथून शेगावकडे पायी जाणार्या वारकर्यांच्या दिंडीतील ट्रॅक्टरला मालवाहू वाहनाने दिलेल्या जोरदार घडकेत तीन वर्षीय सोहम विठ्ठल वारुळकर हा चिमुकला वारकरी जागीच ठार झाला तर अन्य तिघे वारकरी जखमी झाले. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता कवठा फाट्यानजीक घडली.
वाडी अदमपूर दिंडीत वाडी, इसापूर, वाकोडी, वरूळा पंचक्रोशीतील एक हजार वारकरी सहभागी झाले आहेत. ही दिंडी निंबा फाटा मुक्काम आटोपून आज सकाळी ६ वाजता शेगावकडे मार्गस्थ झाली होती. निंबा फाट्यापासून २ कि. मी. अंतरावर कवठा फाट्याजवळ या दिंडीतील ट्रॅक्टर क्र. एम.एच. ३0-६१४३ ला शेगाववरून निंबा फाट्याकडे द्राक्ष भरून जाणार्या मालवाहू वाहन क्र. एमएच ३0 बी ४0७२ ने ट्रॉलीच्या मध्यभागी जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की ट्रॉली ६ फूट अंतरावर तुटून पडली.
यामध्ये ट्रॉलीमध्ये चिमुकला वारकरी सोहम विठ्ठल वारुळकर हा जागीच ठार झाला तर आदीत्य शिवहरी वारुळकार, तन्वी शिवहरी वारुळकार हे गंभीर जखमी झाले.तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रॅक्टर मालक शिवहरी वारुळकर हे सोहमचे काका असून ते स्वत: ट्रॅक्टर चालवत होते. ते सुद्धा या अपघातात जखमी झाले.मालवाहू वाहन क्र. एबी-४0७२ चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या घटनेने वारकर्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी उरळ पोलिसांनी मालवाहुचा चालकाविरुद्ध कलम २७९,३३७,४२७,३0४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार पवार यांच्या मार्गदर्शनात जमादार संजय वानखडे, पोकॉ संतोष सोळंके करीत आहेत.