चिमुकल्यांनी केली पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची सोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:19 AM2021-04-27T04:19:32+5:302021-04-27T04:19:32+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दरम्यान, पाण्याची टंचाई सर्वदूर भासत असल्याने, जंगलातील पशुपक्षी मनुष्य वस्तीच्या सिमेंटच्या जंगलाकडे वळली असून, उष्माघातामुळे ...
उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दरम्यान, पाण्याची टंचाई सर्वदूर भासत असल्याने, जंगलातील पशुपक्षी मनुष्य वस्तीच्या सिमेंटच्या जंगलाकडे वळली असून, उष्माघातामुळे तृष्णा तृप्तीसाठी पक्ष्यांची घालमेल सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत कुमारी आसावरी पंत हिच्या संकल्पनेतून चिमुकल्यांनी चिमण्यांच्या तृष्णा तृप्तीसाठी टाकाऊ वस्तूपासून सुरेख असे अन्न व पाणी पात्र तिने तयार केले आहे. सामाजिक जाण असलेली आसावरी नेहमीच आपल्या विविध संकल्पनेतून नावीन्यपूर्ण असे उपक्रम राबवित असते. याच अनुषंगाने या वर्षी तिचा पर्यावरणपूरक जनजागृती म्हणून १००१ पत्रके वाटण्याचा संकल्प आहे. स्वराली लकडे, संस्कृती पंत, समृद्धी पंत, परिणिता खंडारे, संस्कृती लकडे, गायत्री पुंड या चिमुकल्यांच्या सहकार्याने तिने टाकाऊ वस्तुंपासून सुरेख असे पाणी पात्र बनविले असून, पक्ष्यांची तहान भागविली आहे.
फोटो: मेल फोटोत