‘चिपको-आंदोलन’मुळे वाचले अकोला-बार्शीटाकळी मार्गावरील शेकडो वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:56 AM2020-10-23T10:56:22+5:302020-10-23T11:13:19+5:30
Chipko movement in Akola नवीन वृक्ष लागवड करूनच जुनी झाडे काढण्यात येतील असे शाखा अभियंता ह्यांनी स्पष्टपणे सांगून वृक्षतोड करणार नसल्याचे मान्य केले.
अकोला: अकोला ते बार्शीटाकळी या रस्ता रुंदीकरणाच्या नावावर या रस्त्याच्या कडेला असलेली तब्बल १ हजार ८०० जुने वृक्ष कत्तलीस सुरुवात झाली होती.
या वृक्षताेडीला विराेध करत वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी चिपकाे आंदाेलन केले. या आंदाेलनाची दखल घेत संबंधित अधिकारी, तहसीलदार तसेच ठाणेदार यांनी आंदाेलनस्थळी धाव घेत नवीन वृक्ष लागवडीशिवाय वृक्षतोड करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने वंचितने आंदोलन मागे घेतले. वंचितचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पाताेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या याा आंदाेलनात जिल्हाध्यक्ष,
प्रमोद देंडवेद, प्रभा शिरसाट, राजकुमार दामोदर, सचिन शिराळे यांच्या नेतृत्वाखाली ‘वृक्ष बचाओ’ चिपको आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता कान्हेरी सरप येथे आंदोलन सुरू केले होते. दोन तासांनी शाखा अभियंता, तहसीलदार गजानन हामंद, ठाणेदार तिरुपती राणे यांनी आंदोलकांची भेट घेतली, तसेच वंचितने मागणी केल्याप्रमाणे नवीन वृक्ष लागवड करूनच जुनी झाडे काढण्यात येतील, असे शाखा अभियंता यांनी स्पष्टपणे सांगून वृक्षतोड करणार नसल्याचे मान्य केले. त्यामुळे वंचितचे चिपको आंदोलन मागे घेण्यात आले. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वागले नाही तर बांधकाम विभागाला घेराव घालू, असा इशारा यावेळी पदाधिकारी यांनी दिला.