चोहोट्टय़ाचे ग्रामविकास अधिकारी सोळंके निलंबित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 08:14 PM2017-11-23T20:14:19+5:302017-11-23T20:19:31+5:30
चोहोट्टा बाजार (अकोला): अकोट तालुक्यातील रेल व चोहोट्टा बाजार ग्राम पंचायतचा प्रभार सांभाळलेले ग्रामविकास अधिकारी प्रशांत सोळंके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोहोट्टा बाजार (अकोला): अकोट तालुक्यातील रेल व चोहोट्टा बाजार ग्राम पंचायतचा प्रभार सांभाळलेले ग्रामविकास अधिकारी प्रशांत सोळंके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
त्यांनी चोहोट्टा बाजार येथे कार्यरत असतानाही घरकुल लाभार्थ्यांना डावलले होते. रेल ग्रामपंचायतमध्येसुद्धा त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता केल्याने त्यांच्याबद्दल ग्रामस्थांमध्ये मोठय़ा प्रमाणात रोष होता. त्यांच्या या बेजबाबदारपणाच्या विरोधात चोहोट्टा बाजार ग्रामपंचायत सरपंच नी ता दिलीप वडाळ, सदस्य पवन वर्मा, माजी सरपंच विजया प्रकाश राणे व रेलचे उपसरपंच मोहन कपले आदींनी अनेक वेळा तक्रारी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. ग्रामपंचायत सदस्य पवन वर्मा यांनी सोळंकेवर कारवाईसाठी अकोट गटविकास अधिकार्यांकडे वारंवार पाठपुरावा केला हो ता. सोळंके यांच्यावर आपल्या कामामध्ये सतत अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केले असल्याची माहिती अकोटचे गटविकास अधिकारी कालीदास तापी यांनी दिली आहे.